Download App

“शहांचा राज्यपालपदाचा शब्द, दरेकरांनी विनाकारण बोलू नये”; किर्तीकरांसाठी अडसूळ मैदानात

अमित शहांनी आम्हाला राज्यपाल पदाचा शब्द दिलाय त्यामुळे दरेकरांनी विनाकारण बोलू नये, असे आनंदराव अडसूळ म्हणाले.

Gajanan Kirtikar : शिंदे गटाचे नेते खासदार गजानन किर्तीकर आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्यातील वाद समोर आला आहे. इतेकच नाही तर शिंदे गटातीलच शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत गजानन किर्तीकर यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. या वादात आता माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी उडी घेतली आहे. किर्तीकरांची बाजू घेत त्यांनी दरेकरांना चांगलंच सुनावलं आहे. शिशिर शिंदे कोण आहेत असा सवाल करत आम्ही किर्तीकरांवर कारवाई होऊ देणार नाही. अमित शहांनी आम्हाला राज्यपाल पदाचा शब्द दिलाय त्यामुळे दरेकरांनी विनाकारण बोलू नये नाहीतर महायुतीत ऐक्य नाही असे लोक बोलतील, अशा शब्दांत अडसुळांनी सुनावलं.

“भाजपचेच नेते कटकारस्थानी, कट माझ्या रक्तात नाही”; किर्तीकर दरेकरांवर भडकले

पक्षविरोधी कारवाई केली म्हणून गजानन किर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी होत आहे. शिशिर शिंदे यांनी याबाबत मुख्यमंत्र्‍यांना पत्रही लिहीले होते. त्यानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनीही किर्तीकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अमोल किर्तीकर यांना निवडून आणण्यासाठी गजानन किर्तीकरांनी कट रचल्याचा आरोप दरेकरांनी केला होता. त्यांच्या या आरोपावर संतप्त होत भाजपचेच नेत कटकारस्थानी आहेत असा आरोप किर्तीकरांनी केला होता. ऐन लोकसभा निवडणुकीत महायुतीतील हा बेबनाव समोर आला होता.

या वादात आता माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची एन्ट्री झाली आहे. त्यांनी किर्तीकरांची बाजू घेत दरेकरांना चांगलच सुनावलं आहे. आपण कुणाविषयी बोलतोय याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. ज्याने अनेक वर्ष पक्षात काम केलं अशा व्यक्तीवर आरोप करताना आपण कोण आहोत, किती लहान आहोत याचा विचार केला पाहिजे अशा शब्दांत अडसुळांनी शिशिर शिंदेंना सुनावले.

किर्तीकर म्हणाले होते की मी माझ्या मुलासाठी काम करू शकलो नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांनी मुलासाठी काम केलेले नाही. म्हणून पुरावे असतील तरच बोलावे. फक्त आरोपासाठी आरोप करू नयेत असे अडसुळांनी भाजप नेते आशिष शेलार यांनाही सुनावले. आशिष शेलार यांनी सुद्धा गजानन किर्तीकरांवर टीका केली होती. किर्तीकरांची भूमिका महायुतीच्या युतीधर्माला छेद देणारी आम्ही त्याचा निषेध करतो असे शेलार म्हणाले होते.

चव्हाणांची रामभक्ती, अन् दरेकरांचा खोचक टोलेबाजी; म्हणाले, एका दिवसासाठी अशी नौटंकी 

follow us