Download App

BJP Candidate List : गडकरींना तिकीट मिळालं, ठाकरे म्हणाले, बरं झालं निदान आज तरी..

BJP Candidate List : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने काल उमेदवारांची दुसरी (BJP Candidate List) यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांचा समावेश आहे. पहिल्या यादीत दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे नाव नव्हते. त्यामुळे विरोधकांनी मोठे काहूर उठवले होते. गडकरींचा पत्ता कट होणार, मोदी शहांकडून गडकरींना साईडलाईन करण्याचा डाव खेळला जात आहे, अशी टीका विरोधी नेत्यांनी केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) तर गडकरींना पक्षात येण्याची थेट ऑफरच देऊन टाकली. राज्यात या उलटसुलट चर्चा सुरू असतानाच दुसरी यादी आली. यात गडकरींचे नाव होते. त्यामुळे त्यांच्याबाबतीत निर्माण झालेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. यानंतर गडकरींच्या उमेदवारीवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

उद्धव ठाकरे सध्या राज्यात जनसंवाद दौऱ्यावर आहेत. काल ठाकरेंनी वाशिम येथे सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली तसेच गडकरींच्या उमेदवारीवरही भाष्य केलं. सुरुवातीला देशात भारतीय जनता पार्टीचे फक्त दोन खासदार होते. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासह नितीन गडकरी यांनी पक्ष वाढविला. परंतु, आज भाजपला या निष्ठावंतांचा विसर पडला आहे. दुसऱ्या यादीत गडकरींना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. बरं झालं आज तरी गंगेत घोडं न्हालं अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली.

Lok Sabha Election : भाजपचे 195 उमेदवार जाहीर : नितीन गडकरींना पहिल्या यादीतून डच्चू

दरम्यान,  लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी दुसरी यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळे सुभाष भामरे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहेत. तर, पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), बीडमधून पंकजा मुंडे आणि नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना तर, अहमदनगरमधून सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे.

मोठी बातमी : भाजपची दुसरी यादी जाहीर; पुण्यातून मोहोळ, नगरमधून सुजय विखे मैदानात

भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या  उमेदवारांच्या यादीतही अनेक दिग्गजांना मोदी-शाहंच्या धक्कातंत्राला सामोरे जावे लागले आहेत. यात प्रामुख्याने भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, बीडमधून प्रीतम मुंडे, उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून मनोज कोटक यांचं तिकीट कापण्यात आले आहे. तर, जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांचेही तिकिट कापण्यात आले आहे.

follow us

वेब स्टोरीज