Sujay Vikhe Patil : ‘विरोधकांना स्वप्न पाहुद्यात’ : विखेंचा लंकेंना टोला

Sujay Vikhe Patil : ‘विरोधकांना स्वप्न पाहुद्यात’ :  विखेंचा लंकेंना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके ( Nilesh Lanke )  यांनी अजित पवार ( Ajit Pawar )  यांना 2024 साली मुख्यमंत्री करणार असे विधान केले होते. त्यावर भाजपचे खासदार सुजय विखे पाटील ( Sujay Vikhe ) यांनी निशाणा साधला आहे. सध्या थंडी खूप आहे, त्यामुळे झोप चांगली येते. यामुळे विरोधकांना स्वप्नही पडत आहेत, त्यांना ते पाहू द्या, असा टोला विखेंना लंके यांच्या विधानावर लगावला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी पुणे येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात 2024 साली आपल्याला अजितदादांना मुख्यमंत्री करायचे आहे, त्यासाठी कामाला लागा, असे विधान केले होते. त्यांनी केलेल्या या विधानामुळे चर्चेला उधाण आलं होतं. अजित पवार 5 वर्षासाठी मुख्यमंत्री झाल्यास राज्य 25 वर्षे पुढे जाईल, असेही लंके म्हणाले होते.

यावेळी सुजय विखे हे अहमदनगर येथे बोलत होते. तसेच यंदा कोरोनामुळे तीन वर्षांपासून होऊ न शकलेले अहमदनगर जिल्हा परिषदेचे साईज्योती बचतगटांचे प्रदर्शनला आजपासून सुरुवात झाली आहे. अहमदनगरच्या न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या मैदानावर होत असलेल्या या प्रदर्शनात, कृषी महोत्सव आणि पशू प्रदर्शनाचाही समावेश करण्यात आला आहे. अहमदनगरच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या भव्यदिव्य प्रमाणात प्रदर्शन होत असल्याचे सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.

या एकत्रित प्रदर्शनाला अहमदनगर महोत्सव 2023 नाव देण्यात आले असून यातून महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना शेती विषयक माहिती मिळणार आहे, तर पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती देखील मिळणार आहे, असं देखील सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान अहमदनगर येथे आजपासून सुरू झालेल्या ‘अहमदनगर महोत्सव – 2023’ या कृषी प्रदर्शन, महिला बचत गट आणि पशुप्रदर्शनामध्ये हरियाणा येथील दारा नावाचा बारा कोटी रुपयांचा रेडा हे प्रमुख आकर्षण ठरत आहे. 5 फूट 10 इंच एवढी रेड्याची उंची आहे. त्याचे वय तीन वर्षे असून सकाळी चार वाजल्यापासून या रेड्याचा दिनक्रम सुरू होतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube