Download App

राज ठाकरेंची तोफ धडाडणार; मुंबईत मनसेचा राज्यस्तरीय मेळावा…

मुंबईतील वरळीत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून या मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.

RaJ Thackeray : विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढील काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागलीयं. मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोममध्ये मनसेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (RaJ Thackeray) पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. आगामी निवडणुकीच्या अनुंषगाने राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

मंत्रिमंडळ बैठक अन् व्हिसीद्वारे उपस्थिती, एकनाथ शिंदे पुन्हा नाराज? शंभूराज देसाईंनी स्पष्ट सांगितलं

महाराष्ट्र राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दारुण पराभव झाला होता. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून सर्वच राजकीय पक्ष निवडणूक पूर्व तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या परभवाची कसर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भरुन काढण्यासाठी मनसे सज्ज होत आहे. विधानसभा निवडणूकीच्या निकालाच्या तब्बल दोन महिन्यांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय जाहीर मेळावा मुंबईत होत आहे. या राज्यस्तरीय मेळाव्याला राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, संभाजीनगर मधील गटप्रमुख आणि सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केलंय.

मोठी बातमी! कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

प्रस्थापितांना धक्का देणार का?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याला महत्व प्राप्त झाले आहे. पक्षाची भविष्यातील राजकीय दिशा ठरवण्याच्या दृष्टिकोनातून मेळाव्याला महत्त्व प्राप्त झाला आहे. मेळाव्यात निवडणुकीतील कामगिरीचा आढावा, संघटनात्मक फेरबदल आणि आगामी पालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच पक्षातील संघटनात्मक फेरबदल आणि प्रस्थापितांना धक्का देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मेळाव्यातून नेमका कोणाचा समाचार घेतात आणि आणि कोणावर तोफ डागतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us