‘मी टायर्ड नाही, रिटायर्डही नाही’; दौरा सुरू होण्याआधीच पवारांनी अजितदादांना डिवचलं!

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता खुद्द पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आमनेसामने आले आहेत. अजित पवार यांनी बुधवारी जे भाषण केलं त्यात त्यांनी शरद पवार यांच्या निवृत्तीचा मुद्दा उपस्थित केला होता. यानंतर शरद पवार यांनी त्यांना आपल्या स्टाईलने उत्तर दिले होते. त्यानंतर आज शरद […]

Letsupp Image   2023 07 05T173654.640

sharad pawar ajit Pawar

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता खुद्द पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आमनेसामने आले आहेत. अजित पवार यांनी बुधवारी जे भाषण केलं त्यात त्यांनी शरद पवार यांच्या निवृत्तीचा मुद्दा उपस्थित केला होता. यानंतर शरद पवार यांनी त्यांना आपल्या स्टाईलने उत्तर दिले होते. त्यानंतर आज शरद पवार यांचा राज्यात दौरा सुरू होत आहे. त्यांची पहिलीच सभा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या बालेकिल्ल्यात येवल्यात होत आहे. त्यामुळे शरद पवार यांनी पुन्हा याच मुद्द्यावर अजित पवार आणि छगन भुजबळ यांना डिवचलं आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी रडकुंडीला येऊन शरद पवारांना काय सांगितलं होतं?

पवार म्हणाले, मी का निवृत्त व्हायचं. मी काम करू शकतो, काम करण्याची माझ्यात क्षमता आहे. मी निवृत्त व्हायचं ठरवलं होतं. त्यावेळी पक्षाने मला सांगितलं की तुम्ही निवृत्त होऊ नका. तालुक्यात, जिल्ह्यांत लोकं रडू लागले. मी लोकभावनेचा आदर केला आणि राजीनामा मागे घेतला. त्यामुळे आज मला कुणी का निवृत्त व्हा असं म्हणत आहेत. मी लोकांमध्ये जातो त्यांचे प्रश्न मांडतो यात काय चुकीचं आहे, असा प्रतिसवाल पवार यांनी केला.

ते पुढे म्हणाले, मी संघटनेचा प्रमुख आहे आणि संघटनेचे काम करतो आहे. मी कोणत्या वयात थांबलं पाहिजे हे तुम्ही का सांगत आहात. मी माझा निर्णय घेऊ शकतो, अशा शब्दांत त्यांनी अजित पवा आणि छगन भुजबळांना सुनावलं.

आता राजकारणात नवीन पिढी तयार होत आहे. या नव्या पिढीतून नवीन नेतृत्व तयार करणं हे काम मी करत राहणार आहे. जे काही घडलं तो माझ्यासाठी झटका नव्हता. याआधीही असे प्रसंग मी पाहिले आहेत. मी त्यांचा सामनाही केला आहे. आताही तेच करत आहे. पक्ष पुन्हा कसा उभा करायचा याचे चित्र माझ्या डोक्यात तयार आहे, असे पवार यांनी एका मुलाखतीत म्हटले.

मोठी बातमी! राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

मी टायर्ड नाही, रिटायर्डही नाही 

मोरारजी देसाई कोणत्या वयात पंतप्रधान झाले होते? मला काही पंतप्रधान व्हायचं नाही. मुख्यमंत्रीही व्हायचं नाही. फक्त संघटनेत काम करायचं आहे. त्यासाठी वयाचा काहीच प्रश्न येत नाही. मी टायर्डही नाही, रिटायर्डही नाही असा टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला.

Exit mobile version