Download App

‘जयंत पाटील भाजपच्या वाटेवर, त्यांचं ‘तेव्हाचं’ रडणं नाटकी’; शिंदे गटाच्या आमदाराचा खळबळजनक दावा

Sanjay Shirsat : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याबाबत एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यावेळी जयंत पाटील इतके का रडत होते? त्यांच्या रडण्याचे कारण काय? या प्रश्नांची उत्तर शिरसाट यांनी दिली आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ऐतिहासिक बंडाची वर्षपूर्ती : महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढणारे ते 10 दिवस…

राष्ट्रवादीला आमचा पुळका का आलेला आहे हेच कळायला मार्ग नाही. जे जयंत पाटील स्वतःच भाजपच्या वाटेवर आहेत ते असं म्हणतात. ज्या पक्षाची स्थापनाच मुळात गद्दारीतून झाली आहे. इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांच्याबरोबर केलेली गद्दारी त्याच्यातून निर्माण झालेले हे सर्व आम्हाला गद्दारीची भाषा शिकवणार हे सर्व हास्यास्पद प्रकार आहेत. म्हणून आम्ही त्यांची चिंता करत नाहीत, असे शिरसाट म्हणाले.

शरद पवार यांनी ज्यावेळी राजीनामा दिला त्यावेळी जयंत पाटील का रडत होते, तुम्हाला माहित आहे का ? कारण त्यांना माहित आहे, उद्या शरद पवार साहेब तुम्ही राजीनामा दिला तर मी काय करू ? मी तर मेलोच, म्हणून ते रडत होते बाकी काही नाही. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे ते रडत नव्हते त्यांचं रडणं वेगळंच होतं. हे असे जे बोलणारे असतात ना ते पटकन उड्या मारतात. म्हणून काही दिवस वाट पाहा, तुम्हाला त्यांचे मार्गक्रमण कुठेतरी झालेले दिसेल, असे शिरसाट म्हणाले.

Uddhva Thackeray : जनतेच्या पैशांचा हिशोब थेट BMC मध्ये जाऊनच विचारणार; 1 जुलैला विराट मोर्चा

दरम्यान, संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता जयंत पाटील काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us