Uddhva Thackeray : जनतेच्या पैशांचा हिशोब थेट BMC मध्ये जाऊनच विचारणार; 1 जुलैला विराट मोर्चा
मुंबई : भाजपने मुंबई महापालिकेच्या माध्यमातून जनतेच्या पैशांच्या लूट चालवली आहे. त्यामुळे जनतेच्या या पैशांचा हिशोब थेट महापालिकेतच जाऊन विचारणार आहे. यासाठी येत्या 1 जुलैला महापालिकेवर भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणा शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांनी ही घोषणा शिवसेना भवनात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी आमदार आदित्य ठाकरे आणि इतर नेतेही उपस्थित होते. (shivsena ubt chief Uddhav Thackeray announce rally on bmc on 1 July)
Ram Temple: रामलल्लाचे दर्शन कधी होणार?; प्राणप्रतिष्ठा ते दर्शनापर्यंतची संपूर्ण टाइमलाईन जाहीर
शिवसेना वर्धापन दिनानंतर शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत माजी नगरसेवकांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला. यानंतर बोलताना त्यांनी भाजपने मुंबई महापालिकेच्या माध्यमातून जनतेच्या पैशांच्या लूट चालवली असल्याचा आरोप करत याविरोधात मोर्चा काढणार असल्याचं सांगितले.
आदित्य ठाकरे करणार नेतृत्त्व
यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात, त्याला वाचा फोडण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी, येत्या 1 जुलैला शिवसेना महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे. त्याचं नेतृत्व आदित्य करेल. शिवसेनेची सत्ता आल्यानंतर महापालिकेच्या तिजोरीमध्ये भर पडली आहे. ते पैसे पलिकेचे नव्हते. त्या ठेवी होत्या. त्यातून आम्ही विविध विकासकाम केली. त्यात कोस्टल रोड, जनतेची काम केली गेली. आता मात्र कोणत्याही कारणांसाठी हा जनतेची पैसै वापरला जात आहे. असा आरोप ठाकरे यांनी यावेळी भाजपवर केला.
आता निवडणुका झाल्यास कोण जिंकणार? राष्ट्रवादीने थेट आकडाच सांगितला
महापालिका कामांसंदर्भात चौकशी करण्यात येणार आहे, या घोषणेवर बोलताना ठाकरे म्हणाले की, चोराच्या उलट्या बोंबा सुरु आहेत. कारण 92 हजार कोटींच्या ठेवी राहिल्या कशा? त्यास सर्व पक्षीय लोक होते. कॅगच्या अहवालात देखील तसं काही आलेलं नाही. विना कंत्राट कोणतीही गोष्ट झालेली नाही. तर दुसरीकडे पंतप्रधान निधीवर कोणी जाब विचारणारे नाही. पण महापालिकेच्या खर्चावर मात्र सर्वांच लक्ष होतं, असंही ठाकरे म्हणाले.