Ram Temple: रामलल्लाचे दर्शन कधी होणार?; प्राणप्रतिष्ठा ते दर्शनापर्यंतची संपूर्ण टाइमलाईन जाहीर
Ram Temple: अयोध्येतील राम मंदिर सर्व सामन्यांसाठी कधीपासून खुलं होणार याबाबत अनेक तर्कवितर्क आणि तारखा समोर येत होत्या. मात्र, आता राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी मोठी अपडेट दिली आहे. 15 जानेवारी 2024 ते 24 जानेवारी 2024 दरम्यान राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होऊ शकते असे मिश्रा यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले.
राम मंदिराच्या शिखरावर आणि गर्भगृहाच्या मुख्य दरवाजावर सोन्याचा थर लावणार आहेत. गर्भगृहाचा मुख्य दरवाजा सोन्याने मढवला जाणार आहे. त्यावर सोन्याचे नक्षीकाम असणार आहे, तसेच मंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावर सोन्याचा मुलामा चढवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच लवकरच मंदिराची पायाभरणी होईल, तेव्हाच अयोध्येला जाईन, असे पंतप्रधानांच्या मनात होते, म्हणूनच ते ५ ऑगस्ट २०२१ रोजी येथे आले होते.
राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष म्हणाले की, याआधी २० वर्षापूर्वी पंतप्रधान मोदी येथे आले नव्हते. ते अयोध्येभोवती अनेकवेळा आले होते, परंतु इकडे आले नाहीत. राम मंदिराचे काम कधी पूर्ण होणार याबाबत अनेकदा चुकीची माहिती समोर येत आहे. ज्याबाबत रामजन्मभूमी ट्रस्टचे चंपत राय अशा वृत्ताचे खंडन करत आहेत.
Ganesh Sugar Factory Election; ‘ही सुरुवात आहे हे लक्षात ठेवा’, थोरातांचा विखेंवर हल्लाबोल
यापूर्वी नृपेंद्र मिश्रा यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, राम मंदिराचे बांधकाम ३ टप्प्यात केले जात असल्याची माहिती दिली होती. पहिल्या टप्प्याचे काम यावर्षीच पूर्ण होईल, असे ते म्हणाले होते. त्यांनी सांगितले होते की, पहिल्या टप्प्यात ५ मंडप बांधले जाणार आहेत, त्यातील मुख्य मंडप गर्भगृह असेल, जिथे रामललाची मूर्ती स्थापित केली जाणार आहे.