Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपवर टीका करत आहेत. आता कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांना मोठा गौप्यस्फोट केला आहे. काही दिवसांआधीच सांगितलं होतं की शिवसेनेनंतर राष्ट्रवादी टार्गेट आहे. त्यानुसार घर फोडलं, पक्ष फोडला. आता आगामी निवडणुकीच्या आधी काँग्रेस सुद्धा टार्गेट असू शकते, असा खळबळजनक गौप्यस्फोट रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला.
अजित पवार यांच्याबरोबर जे आमदार, पदाधिकारी गेले आहेत. त्यांना शरद पवाक यांच्या वयाबद्दल बोललेलं आवडलेलं नाही. त्यामुळे ते लवकरच परत येतील अलेही त्यांनी सांगितले.
लोकसभेत महाराष्ट्राचा डंका! सुजय विखे पाटलांसह 5 नवोदित खासदार चमकले
आमदार पवार सध्या त्यांच्या कर्जत मतदारसंघात आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वयाबद्दल जो काही उल्लेख केला त्यामुळे त्यांच्याकडील 30 ते 40 टक्के लोक मागे फिरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पुढील 10 ते 15 दिवसांत काय परिस्थिती राहिल हे पहा, असा इशारा त्यांनी अजित पवार गटाला दिला.
पक्ष फोडण्याचे जे राजकारण भाजपकडून केलं जात आहे. ते काही जनतेच्या प्रेमापोटी करत नाही तर फक्त सत्तेत येण्यासाठी केलं जात आहे. मात्र, राज्यातील जनतेला आता भाजपाचा हा डाव लक्षात आला आहे. येणाऱ्या काळात पक्ष बांधणीसाठी काम करावे लागणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या गलिच्छ विचारांशी लढण्यासाठी आम्ही सज्ज असून भाजपला धडा शिकवण्याचा निर्धार नेते आणि कार्यकर्त्यांनी केल्याचे पवार यांनी सांगितले.
फडवीसांवरील टीका झोंबली! बावनकुळेंनी वाचला ठाकरेंच्या ‘कंलंकीत करंटेपणाचा’ पाढा
पक्ष फुटीवर राज्यातील लोकांमध्ये काय चर्चा सुरू आहे. यावरून नेत्यांनाही अंदाज आला आहे. पक्षाची बांधणी करत असताना जे आपल्याबरोबर राहिले आहेत त्यांना न्याय देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.