Download App

Maratha Andolan : ‘ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही’; वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं

Maratha Andolan : जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीमाराच्या (Maratha Andolan) घटनेने महाराष्ट्रात संताप उसळला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद अजूनही उमटत आहेत. ठिकठिकाणी आंदोलने आणि मोर्चे निघत आहेत. विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच जीव गेला तरी चालेल पण ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Maratha Reservation : ‘सत्ताधाऱ्यांची नार्को टेस्ट करा, सत्य बाहेर येईल’; वडेट्टीवारांनी दिलं आव्हान

वडेट्टीवार यांनी आज नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आंदोलन (Maratha Andolan), मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. वडेट्टीवार म्हणाले, सरकारने चूक कबूल केली हे महाराष्ट्रातील लोकांना आणि मराठा समाजाला कळून चुकलेलं आहे. हा लाठीहल्ला पुरस्कृत होता हे सिद्ध झालेलं आहे.

मूळ ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही

सरकारने या मुद्द्यावर लवकर तोडगा काढावा. ओबीसींचे आरक्षण वाढवून द्यावे. आंदोलनस्थळी (Maratha Andolan) जाऊन मी हेच बोललो होतो. ओबीसी कार्यकर्ता म्हणून मूळ ओबीसी आरक्षणाला धक्के लागू देणार नाही मग, जीव गेला तरी चालेल. राज्य आणि केंद्रात असल्याने हे बहुमताचं सरकार आहे. जी भूमिका ओबीसींची आहे तीच भूमिका माझी देखील असेल. सरकार वेगळी भूमिका घेतं तर बावनकुळे वेगळेच बोलतात. लोकांच्या डोळ्यांत धूळफेक करत आहे का? दोन समाजात भांडण लावायची भूमिका बावनकुळे यांची असेल तर मराठा समाज जे समजायचं ते समजेल. पक्षाचा प्रमुख एक बोलतो आणि बाकीचे वेगळे बोलतात, हे चाललंय काय असा संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी केला.

Maratha Reservation च्या अध्यादेशावर जरांगे ठाम; सरकर म्हणतयं, कोर्टात टिकणार नाही

30 दिवस काय 30 महिने घेतले तरी शक्य नाहीच

आंदोलकांना आरक्षण जाहीर करणयासाठी 30 दिवसांचा वेळ मागितला आहे. 30 दिवसच काय 30 महिने घेतले तरी ते (Maratha Andolan) शक्य नाही. ही शुद्ध धुळफेक आहे. मराठा-ओबीसीत भांडण लावण्याचं काम सरकारने करू नये. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाचं नुकसान होऊ नये अशी आमची भूमिका आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा कोणताच विरोध नाही पण, ओबीसींचाही टक्का वाढवा अशी आमची मागणी असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

follow us