Devendra Fadnavis : भाजप नेते आ. गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केलेल्या टीकेवरून राज्यभरातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. अजित पवार गटाचे नेते तर प्रचंड संतापले असून ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. पडळकर यांच्या वक्तव्याने भाजपही बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे. फडणवीस यांनी आपल्या पक्षातील लोकांना आवरावे, अशा प्रतिक्रिया अजित पवार गटातील नेत्यांनी दिल्या होत्या. या सगळ्या घडामोडींनंत आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या वादावर भाष्य केले आहे. फडणवीस म्हणाले, गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचं वक्तव्य अयोग्य आहे. अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीच आहे. तिन्ही पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि आमदारांनी तिन्ही पक्षातील नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. अशा प्रकारच्या भाषेचा उपयोग करू नये असं माझं मत आहे.
Ahmednagar Politics : 2024 मध्ये कुणाचं सरकार? तनपुरेंनी स्पष्टच सांगितलं
भाजप आमदार गोपीचंद पडळकर पवार कुटुंबियांवर नेहमीच टोकाची टीका करत असतात. विरोधी पक्षात असताना अजित पवारांवर ते जोरदार टीका करायचे. पण, अजितदादा सरकारमध्ये आल्यानंतर पडळकरांकडून फारशी टीका होत नव्हती. परंतु, काही दिवसांपूर्वी त्यांनी अचानक अजित पवारांवर घणाघाती टीका केली. त्यांची (अजित पवार) भावना आमच्याबद्दल स्वच्छ नाही. त्यामुळं त्यांना पत्र देण्याची गरज नाही. लबाड लांडग्याचं पिल्लू आहे ते. त्यामुळं त्यांना आम्ही मानत नाही. म्हणून आम्ही त्यांना पत्र दिलं नाही आणि यापुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळतो त्या दोघांना मी पत्र दिलं आहे, असे पडळकर म्हणाले होते.
पडळकरांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी प्रचंड संतापल्याचे दिसले. ते म्हणाले, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की तुमच्या पाळीव कुत्र्याला आवर घाला. गोप्या औकातीच्या बाहेर भुंकत आहे. ज्याची खाती मंगळसूत्र चोर आहे. जो समाजाचा, देवाचा होऊ शकत नाही, अशा गोप्याला वेसण घालावी. गोप्यासारख्या रानडुक्कराला वेळीच आवर घाला. उपमुख्यमंत्री अजितदादांबद्दल बोलताना तो लायकीच्या बाहेर बोलला आहे. याला आवर न घातल्यास आम्हाला आवर घालणे कठीण होईल असा इशार मिटकरी यांनी दिला होता.