पडळकरांना आवर घालावा नाही तर आम्ही सत्तेत आहोत हे विसरू; अमोल मिटकरांचा थेट इशारा
Amol Mitkari On Gopichand Padalkar : अजित पवार सत्तेत आले असले तरी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबांवर थेट हल्लाबोल करण्यास सोडले नाही. धनगर आरक्षणावर बोलत असताना गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार व सुप्रिय सुळेंवर आक्षेपार्ह विधान केले आहे. अजित पवार म्हणजे लांडग्याचे पिल्लू आहे. तर सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक आहे, असा आक्षेपार्ह विधान गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. त्यावरून अजित पवार गटाचे आमदार, स्थानिक पदाधिकारी हे पडळकरांवर चिडले आहेत. पडळकरांना त्याच भाषेत ते आता उत्तर देऊ लागले आहेत. पडळकरांना आवर घालावा नाही तर आम्ही सत्तेत आहो हे विसरून जावू, असा इशाराही अमोल मिटकरींनी दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यावर खालच्या पातळीवर टिका करणाऱ्या मंगळसुत्र चोराविरुद्ध मदनलाल धिंग्रा चौक अकोला येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.गृहमंत्री देवेंद्रजींनी याला तात्काळ आवर घालावा नाहीतर आम्ही सत्तेत आहोत हे विसरून जाऊ. pic.twitter.com/Ja9MHoOkze
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) September 18, 2023
अमोल मिटकरी म्हणाले, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की, तुमच्या पाळीव कुत्र्याला आवर घाला, गोप्या औकातीच्या बाहेर भुंकत आहे. ज्याची खाती मंगळसूत्र चोर आहे. जो समाजाचा, आईचा, भावाचा, देवाचा होऊ शकत नाही, अशा गोप्याला वेसन घालावी. गोप्यासारख्या रानडुक्कराला वेळीस आवर घाला. उपमुख्यमंत्री अजितदादांबद्दल बोलताना तो त्याच्या लायकीच्या बाहेर बोलला आहे. याला आवर न घातल्यास आम्हाला आवर घालणे कठीण होईल, असा थेट इशाराही अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
गोप्या हा अजितदादांविरोधात बारामतीमध्ये निवडणुकीत उभा राहिला होता. त्याची काय लायकी आहे ती बारामतीकरांनी दाखवून दिली आहे, अशी आठवणही मिटकरींनी करून दिली आहे. पडळकर विरोधात अजित पवार गटाचे नेते चिडले आहे. त्याचे पडसादही उमटू लागले आहेत. पुण्यात अजित पवार गटाकडून मिटकरींचा निषेध नोंदविण्यात आला आहे. तर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही भाजपने पडळकरांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
अजित पवार म्हणजे लबाड लांडग्याचे पिल्लू, गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान
अजित पवार गटाचे नेते तीव्र प्रतिक्रिया नोंदवित आहेत. त्यात पडळकरांवर फडणवीसांनी कारवाई करावी, अशी मागणी आहे. परंतु अद्याप भाजपच्या एकाही नेता यावर अद्याप तरी बोललेला नाही.