शरद पवारांवर बोलणाऱ्या भुजबळ, धनंजय मुंडेंचाही निषेध कराल; पुण्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात जुंपली !
पुणे : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबियावर आक्षेपार्ह टीका केली आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणीवर बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणजे हे लबाड लांडग्याचे पिल्लू आहे. तर सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक आहे, असे गोपीचंद पडळकर म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पडळकरांविरोधात आक्रमक झाले आहेत. तर पुण्यात अजित पवार गटाने गोपीचंद पडळकरांचा जोरदार निषेध केला आहे. त्यावर शरद पवार गटाचे स्थानिक नेते अंकुश काकडे यांनी अजित पवार गटाला टोमणाही मारला आहे.
…तेव्हा शिवसेना सोडणाऱ्यांच्या यादीत घोलप आघाडीवर; छगन भुजबळांचा गंभीर आरोप
निषेध आंदोलनात अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, पुणे शहर राष्ट्रवादी युवक,महिला, विद्यार्थी, युवती काँग्रेसकडून पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. पुण्यातील बालगंधर्व चौकात हे आंदोलन झाले. त्यावर अंकुश काकडे यांनी शहराध्यक्ष, दीपक मानकर,
प्रदीप देशमुख यांना एक पत्र लिहिले आहे.
अजित पवार म्हणजे लबाड लांडग्याचे पिल्लू, गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान
गोपीचंद पडळकर यांचा आम्ही निषेध करतो. तो आजपर्यंत पवारांच्या विरोधामध्ये बोलण्याशिवाय दुसरे काही करू शकला आहे. त्यामुळे त्याचा निषेध करू तेवढा थोडाच आहे. आपण त्याचा निषेध करीत आहात ही चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर शरद पवार यांच्याविरोधात छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे जे बोलले त्याचाही निषेध आपण करावा. या तिघांचा निषेध करणार असाल, तर आम्हीही त्यात सहभागी होऊ, असा टोमणा अंकुश काकडे यांनी अजित पवार गटाला लगावला आहे. अंकुश काकडे यांच्या टोमण्याला अद्याप अजित पवार गटाकडून उत्तर आलेले आहे.
अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यानंतरही भाजपचे आमदार असलेले गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबावर आरोप व टीका करण्यास सोडलेले नाही. त्यामुळे आता अजित पवार समर्थकही पडळकरांवर नाराज झालेले आहेत.