Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Maharashtra Political Crisis) निकाल दिल्यानंतर आता 16 आमदारांच्या अपात्रतेचं काय होणार हा प्रश्न आहे. याचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यायचा आहे. मात्र, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आपल्या आमदारांवर अपात्रतेची वेळच येऊ देणार नाही. लवकरच महाविकास आघाडी तुटेल आणि उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट एकत्र येतील असा दावा काँग्रेसचे निलंबित नेते डॉ. आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात ढकलला आहे. आता हा निर्णय अध्यक्ष घेतील. तरी देखील राजकारणात काय होईल काही सांगता येत नाही. ज्या कारणासाठी एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले ते बाजूला ठेऊन आमदार अपात्र होणार नाहीत यासाठी वेगळी समीकरणे तयार होतील अशी वक्तव्ये नेतेमंडळी करत आहेत.
रेल्वे तिकीटांच्या आरक्षणात घोटाळ्याचा वास? अजितदादांना मिळाली चक्क राणेंची साथ
जर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतला गेला तर पुढील सहा वर्षांसाठी त्यांच्यावर ही अपात्रता लागू राहिल. त्यामुळ अनेकांचे राजकारण संपण्याचा धोका आहे. त्यामुळे दोन्ही गट आगामी काळात एकत्र येतील. आमदारांच्या अपात्रतेचे तांत्रिक मुद्दे पाहिले तर कुणालाही राजकारणातून बाद होणे पसंत पडणार नाही. मग एकच मार्ग राहिल तो म्हणजे दोन्ही शिवसेना एकत्र करणे, असे देशमुख म्हणाले.
दरम्यान, आमदारांच्या अपात्रतेचा निकाल अध्यक्षांकडून येणे अद्याप बाकी आहे. दुसरीकडे राज्य सरकारने मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कोणाला मंत्रिपद मिळणार याची यादीही समोर आली आहे. महाविकास आघाडीकडून आगामी निवडणुकांसाठी जागावाटपावर चर्चा सुरू आहे. आता तर तिन्ही पक्षांतील जागा वाटपाची यादीच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. वज्रमूठ सभा पुन्हा घेण्याचेही नियोजन केले जात आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसच्याच एका नेत्याने केलेला हा दावा महाविकास आघाडीसाठी अडचणीचा ठरू शकतो. या दाव्यावर आता महाविकास आघाडीचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बच्चू कडूंचा मंत्रिमंडळातून पत्ता कट? अध्यक्षपद देऊन कॅबिनेट दर्जा