बच्चू कडूंचा मंत्रिमंडळातून पत्ता कट? अध्यक्षपद देऊन कॅबिनेट दर्जा
मुंबई : शिंदे सरकारला पाठिंबा दिलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. बच्चू कडू यांची दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आदेशानंंतर याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयानंतर बच्चू कडू यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आभार मानले. (MLA Bacchu Kadu Appoint as Chairman of Disability Welfare Department)
काय म्हटलं आहे निर्णयात?
राज्यात जून महिन्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी हे आभियान राबिण्यात येणार आहे. हे अभियान दिव्यांगांच्या दारापर्यंत पोहचवण्यासाठी बच्चू कडू यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. शासनाने यासंबधीचे एक परिपत्रक काढून बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा जाहीर केला आहे.
Bacchu Kadu यांना मंत्रिपदाचा दर्जा; CM शिंदेंच्या आदेशानंतर शासन निर्णय जारी
मंत्रिमंडळतून कडूंचा पत्ता कट?
दरम्यान, या निर्णयानंतर बच्चू कडू यांचा मंत्रिमंडळ विस्तारातून पत्ता कट झाला असलाच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार प्रतिक्षेत आहेत. तो योग्य वेळी पण लवकरच होणार असल्याचा दावा शिंदे-फडणवीस करत आहेत. अशात बच्चू कडूही मंत्रिमंडळ विस्तारासाठी आग्रही आहेत. त्यांनी हा विस्तार होत नसल्याने नाराजी व्यक्त करत थेट उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली होती.
‘मविआ’चं जागावाटप ठरलं? ठाकरे ठरले लहान भाऊ; यादीत काँग्रेस, राष्ट्रवादीचा वरचष्मा
“जेवणाचं आमंत्रण हे जेवल्याशिवाय खरं नसतं, घोडामैदान जवळ आहे. मंत्री झालो नाही तरीही कामं करतो. मंत्री झालो तर वेगाने काम करेन. पण मंत्रिमंडळाचा विस्तार आता झाला पाहिजे. विस्तार तातडीने झाला पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र पालकमंत्री मिळणं आवश्यक आहे, ही जनतेची मागणी आहे.
एक व्यक्ती आठ जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद किंवा आठ खाती संभाळत असेल तर निश्चित सेवेला बाधा येते, असं बच्चू कडू म्हणाले होते. त्यानंतर आता बच्चू कडू यांची दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करुन त्यांची बोळवण करण्यात आली असल्याची चर्चा रंगली आहे.