Download App

अजित पवारांबाबत अफवा, फडणवीसांची चुप्पी अन् मीडियाची धावपळ

  • Written By: Last Updated:

Devendra Fadanvis Silent In Ajit Pawar Rumors :  गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार हे राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चांनी अक्षरक्षः ऊत आणला आहे. अजितदादांना 40 आमदारांचा पाठिंबा आहे अशादेखील बातम्या समोर आल्या. त्यात पंधरा दिवासांमध्ये अजित पवारांनी त्यांचे नियोजित कार्यक्रम दोनवेळा अचानक रद्द केले. त्यावेळेसदेखील अजित पवार पुन्हा एकदा मोठा राजकीय बॉम्ब फोडणार अशा अफवा पसरवल्या गेल्या होत्या. त्यानंतर अगदी दोन दिवसांपूर्वी नागपूरमधील ‘वज्रमुठ’ सभेनंतर अजित पवारांनी थेट मुंबई गाठली. त्यानंतर त्यांचे पुण्यात काही नियोजित कार्यक्रम होते. मात्र, त्यांनी ते अचानक रद्द केले. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळाले. या सर्व चर्चांमध्ये राष्ट्रवादीतील काही आमदार, काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते एवढेच काय तर सत्तेतील शिंदे-फडणवीस सरकारमधील अनेक नेत्यांनी या गोष्टीला दुजोरा देत विविध विधाने केले. त्यात अमित शाहदेखील मुंबईत येऊन गेले.

भाजप राज्यात एकहाती सत्ता आणू शकत नाही, शिवसेना खासदारांच्या वक्तव्याने राजकीय चर्चा

परंतु, या सर्व घडामोडींध्ये धावपळ झाली ती पत्रकारांची कधी या नेत्याचा बाईट तर कधी त्या नेत्याचं मत असे करत पत्रकार मंडळी पायाला भिंगरी लावल्यासारखे धाव धाव धावत होते. मात्र अजित पवार आज दुपारपर्यंत माध्यमांसमोर येईपर्यंत त्यांच्या हाती ठोस असे काहीच लागेल नाही. त्यामुळे या सर्वांचा सामना चित्रपटातीस ‘दिगू टिपणीस’ झाल्याची अवस्था अनेक पत्रकारांच्या चेहऱ्यावरून दिसून येत होती.
राज्यात घडणाऱ्या या घडामोडींमध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिंदे गट, भाजपचे काही नेते माध्यमांसमोर येऊन त्यांची मतं व्यक्त करून गेले. मात्र, ‘भाजपचे चाणक्य’ म्हणून ओळख असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अफवांमध्ये एक चकार शब्ददेखील काढला नाही.

अजितदादा राऊतांवर का चिडले ? ; शिरसाटांनी सांगितलं नेमकं कारण..

याचा अर्थ ते अजित पवारांना सोबत घेऊन जाण्यास इच्छूक नाही असा होत नाही. कारण, ज्यावेळी भाजपने ठाकरे गटाशी म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती तोडल्यानंतर अवघे राज्य साखर झोपेत असताना पहाटेच्यावेळी अजित पवारांसोबत सत्ता स्थापन केली होती. एवढेच काय तर, मध्यंतरीच्या काळात विधानपरिषदेचा निकाल लागल्यानंतर फडणवीसांनी आता सारखेच शांत राहून रणनीती आखत शिंदेंसह 40 आमदार फोडले होते. त्यानंतर जे काही राजकीय नाट्य सुरू होते त्याची दखल अवघ्या देशाने घेतली होती.

‘आता तर कुठं अजितदादा हसायला शिकले, त्यांना आणखी हसवा, ते तुमच्याशी…’

दुसरीकडे, अजित पवार यांची जे पोटात ते ओठात अशी ख्याती आहे. मात्र, राजकारणात सर्वच पत्ते उघडायचे नसतात. त्या युक्तीप्रमाणे अजितदादादेखील काही पत्ते झाकून आहेत याची जाणीव राज्यातील प्रत्येक नेत्यांना आहे. त्यामुळे जरी अजित पवार माध्यमांसमोर येऊन जरी सांगत असले की, मी राष्ट्रवादीसोबत असून जिवात जीव असेपर्यंत पक्षातच राहणार असल्याचे जरी सांगितले असले तरी राष्ट्रवादी पक्ष भाजपसोबत जाणार नाही हे ठामपणे सांगितलेले नाही. त्यामुळे अजितदादांना बंड करायचेच असेल तर, ते एवढा गाजावाजा करून बंड करत राजकीय भूकंप घडवणार नाही.

राहिला प्रश्न फडणवीसांचा तर, ते अतिशय चाणाक्ष राजकारणी म्हणून ओळखले जातात सर्व आकडे जुळून आल्यानंतरच ते गेम करतील त्यामुळे अजित पवारांच्या या सर्व बातम्यांमध्ये त्यांचे अशा पद्धतीने गप्प राहणे हेही एकप्रकारे भविष्यातील एखाद्या मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत असू शकतात यात काही शंका नाही.

Tags

follow us