Download App

‘ही कसली मुलाखत ही तर जळजळ, मळमळ अन् अपचनाचे करपट ढेकर’; शेलारांचा ठाकरेंवर पलटवार

Ashish Shelar replies Uddhav Thackray : शिवसेना पॉडकास्टच्या माध्यमातून खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारसह राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या या टीकेवर आता भाजप नेते आक्रमक झाले असून त्यांनीही ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्राच्या जनमताशी ज्यांनी बेईमानी केली ते इमानदार कसे? कितीही मुलाखती दिल्या तरी बेईमानीच पुसणार नाहीत आता ते ठसे! ही कसली मुलाखत… ही तर जळजळ, मळमळ आणि अपचनाचे करपट ढेकर. स्वतःचा पक्ष, सरकार न सांभाळायच्या कलंकातून बाहेर पडण्याची धडपड!!

भरलेल्या डालड्याचा डबा उपयोगाला तरी येतो रिकामा डबा टमरेल ठतो! एक काळ मुलाखतीतून वंदनीय हिंदुहृहयसम्राट बाळासाहेब ठाकरे डागायचे ते असे काडतूस हल्ली सगळं फडतूस, फडतूस आणि फडतूस!!! असे ट्विट शेलार यांनी केले आहे.

राष्ट्रवादीने काय गद्दारी केली म्हणून फोडाफोडी केली

शिवसेनेनं खंजीर खुपसला मग राष्ट्रवादीनं काय खुपसलं होतं? शिवसेना फोडून ४० आमदार आल्यानंतर संख्याबळ असतानाही राष्ट्रवादी का फोडलीत? ते फोडण्याआधी चार ते पाच दिवस आधी पंतप्रधानांनीच आरोप केले होते. त्या आरोपांचं आता काय झालं? त्या घोटाळ्याच्या पैशांचं काय झालं? कशासाठी ही फोडाफोडी केलीत? म्हणूनच म्हटलं एवढा भ्रष्टाचारी राष्ट्रवादी पक्ष आहे किंवा होता तर त्यांनी नेमकी तुमच्याशी काय गद्दारी केली होती की तुम्ही त्यांना फोडलंत?, असे भाजपला टोचणारे सवाल उद्धव ठाकरेंनी केले.

Tags

follow us