थोरात-विखे-गडाख; सहकारातील मुरब्बी एकत्र… जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट!

Ahilyanagar District Bank Election; बाळासाहेब थोरात तसेच सुजय विखे व माजी मंत्री राहिलेले शंकरराव गडाख यांची नुकतीच एक बैठक ही पार पडली.

Ahilyanagar District Bank Election

Ahilyanagar District Bank Election:अहिल्यानगर – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नवनवीन घडामोडी घडू लागले असून संगमनेर मध्ये कट्टर राजकीय विरोधक एकत्र आल्याने एकच चर्चा झाली होती. आता त्या पाठोपाठ पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात तसेच सुजय विखे व माजी मंत्री राहिलेले शंकरराव गडाख यांची नुकतीच एक बैठक ही पार पडली. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एकमेकांचे विरोधक असलेले नेते मंडळी देखील एकत्र आले व यातच पुन्हा एकदा गडाख थोरात विखे यांच्या भेटीने निवडणुकीमध्ये नेमकं काय राजकीय समीकरण जुळून येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

पुण्यातील आंदोलन महाराष्ट्राचं जंतरमंतर; फडणवीसांपर्यंत आवाज जाऊ द्या” संजय राऊतांचा हल्लाबोल

जिल्हा बँक निवडणूक ही बिनविरोध व्हावी, यासाठी संगमनेर मध्ये काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी विशेष म्हणजे थोरात यांचे राजकीय विरोधक असलेले सुजय विखे हे देखील या बैठकीला उपस्थित होते. त्याचबरोबर विरोधक व सत्ताधारी एकाच ठिकाणी जमा झाल्याने व ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न करू लागल्याने सुरुवातीपासूनच या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

MPSC विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात; फडणवीसांना थेट फोन, म्हणाले- ‘संवादातून मार्ग काढा’

दरम्यान, संगमनेर मध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये विधान परिषदेचे सभापती राम शिंदे तसेच खासदार निलेश लंके यांना बाजूला ठेवण्यात आल्याने देखील मोठ्या चर्चा झाल्या. 5 ऑक्टोबर ही अंतिम अर्ज दाखल करण्याची तारीख असल्याने, त्यापूर्वीच इच्छुकांची मोठी भाऊ गर्दी असल्याने या निवडणुकीसाठी मोठे अर्ज विक्री झाली आहे. मात्र बिनविरोधच्या दिशेने तयारीत असलेले या निवडणुकीसाठी विखे थोरात व गडाख यांनी पुन्हा एकदा पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे.

थोरात विखे गडाख यांच्याकडे सहकारातील अनुभव व तितकेच संवेदनशील नेतृत्व म्हणून पाहिले जाते. त्यामुळे हे तिघे नेते मंडळी सोनाईच्या आमराईत जिल्हा बँकेच्या राजकारणावरून तब्बल तास ते दीड तास तिघांमध्ये बैठक पार पडली. सोनईच्या भेटीत नेमके काय ठरले व बिनविरोधच्या वाटेवरील चर्चा की निवडणूक लढण्याची रणनीती हे उद्यापर्यंत समजून जाईल.

ज्ञानेश कुमारांची 20 वर्षांपूर्वीची फाईल उघडली; भ्रष्टाचार, गुन्हेगारी गैरवर्तनाचे आरोप, कोणता सरकारकडून चौकशीचे आदेश ?

राम शिंदे उद्या अर्ज दाखल करणार

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सुरुवातीपासूनच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपण लक्ष घालणार, असे सुतोवाच केले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी शिंदे यांनी अर्ज देखील घेऊन गेले आहेत. दरम्यान, 5 ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असल्याने उद्या अर्ज दाखल करणार असल्याची शिंदे यांची पोस्ट देखील सोशल मीडियावर वायरल होऊ लागली आहे. यामुळे राम शिंदे यांची मनधरणी होणार की ते विरोधात पॅनल उभे करणार याकडे देखील लक्ष लागलेले आहे.

follow us