Download App

फुकरे ते फुकरेच, तीन पैशांचा तमाशा करणाऱ्यांना.. लाडांचा राऊतांना रोखठोक इशारा !

Maharashtra Politics  : राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) सध्या ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद शिगेला पोहोचला आहे. यामध्ये खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आघाडीवर असून सामनातून भाजप (BJP) आणि शिंदे गटावर तुफान हल्ला चढवत आहेत. तर दुसरीकडे भाजप नेतेही जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आज सामनाच्या अग्रलेखातून राऊत यांनी भाजपला लक्ष्य केले होते. त्यानंतर संतापलेल्या लाड यांनी राऊतांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.

Girish Mahajan : लोक संजय राऊतांकडे जोकर म्हणून बघतात

राऊत यांच्या या टीकेबाबत लाड यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, जे आधी रात्री फुकायचे ते आता दिवसा देखील फुकतात. जे लोक आधी रात्री फुकायचे ते आता सकाळी सुद्धा फुकून बोलायला लागले आहेत. त्या फुकऱ्यांबद्दल काय बोलायचे असा प्रश्न आता आम्हाला पडला आहे. फुकरे ते फुकरेच असतात त्यांच्या बोलण्याकडे आम्ही जास्त लक्ष देत नाही, असे लाड म्हणाले.

सामनाच्या अग्रलेखात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा उल्लेख चवण्णी असा केला आहे. यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राज्यात तीन जणांचा तीन पैशांचा तमाशा सुरू आहे. त्यांना चवण्णी, अठण्णी बोलण्याची सवयच असते. या लोकांना आम्ही वेळ आल्यावर आमच्या भाषेत उत्तर देऊ असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

फडणविसांनी ठाकरेंवर भावासारखं प्रेम केलं : बावनकुळे असं का म्हणाले?

दरम्यान,  काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांच्या या टीकेचा राऊत यांनी समाचार घेतला.  नारायण राणे यांचे नाव घ्यायलाही आम्हाला लाज वाटते. कोण आहेत हे लोक ?, यांनी शंभर वेळा पक्ष बदलला. आपल्या आईला बदललं. जो आपल्या आईला बदलतो त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलावं. भाजपला अशा बेईमान लोकांना मंत्रिपद देण्याची सवयच झाली आहे, अशा शब्दांत राऊत यांनी टीका केली.

 

 

Tags

follow us