Download App

Maharashtra Politics : 5 डिसेंबरला फक्त तिघांचाच होणार शपथविधी, CM पदाची शपथ कोण घेणार?

5 तारखेला केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल असं वृत्त एका वाहिनीनं दिलं. 

  • Written By: Last Updated:

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Election) निकाल लागून आठवडा उलटला असला तरीही सत्तास्थापनेचा पेच अद्याप कायम आहे. अशातच येत्या 5 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली. 5 तारखेला केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल असं वृत्त एका वाहिनीनं दिलं.

लक्झरी कार, चित्रपटांसाठी भरघोस फी, विक्रांत मॅसीची नेट वर्थ जाणून व्हाल थक्क 

विधानसभा निवडणुकीत मविआचं पानीपत झाल्यानंतर राज्यात महायुतीचीच सत्ता येणार हे स्पष्ट झालं. आता सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला. शिवसेनेच्या आमदारांनी विधिमंडळातील गटनेतेपदी एकनाथ शिंदेची, तर राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवार यांची निवड केली. मात्र विधानसभेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने अद्याप विधीमंडळ गटनेता निवडलेला नाही.

भापज गटनेत्याची निवड झाल्यानंतर नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. दरम्यान, भाजपचा विधिमंडळ गटनेता निवडीसाठी 4 डिसेंबरला मुंबईत बैठक होणार आहे. यासाठी भाजपने निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांची निरीक्षक म्हणून निवड केली आहे. उद्या सायंकाळपर्यंत पक्षाचे निरीक्षक मुंबईत पोहोचणार असल्याचे वृत्त आहे. त्यानंतर 4 तारखेला भाजप आमदारांची बैठक होऊन विधीमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाईल.

सेक्स वर्कर्सनाही मिळणार प्रसूती रजा, पेन्शन अन् आरोग्य विमा, जाणून घ्या नवीन कायदा 

विधीमंडळ गटनेत्यचाची निवड झाल्यानंतर राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल. 5 तारखेला केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

दरम्यान, राज्याच्या मंत्रिमंडळात कमाल 43 सदस्य असतात. त्यापैकी 21 मंत्रीपदे भाजपकडे कायम राहण्याची शक्यता आहे. शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 10 मंत्री मिळू शकतात.

follow us