Devendra Fadnavis : हसन मुश्रीफांवरील कारवाईवर फडणवीसांचे एकाच वाक्यात उत्तर, म्हणाले..

Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील ईडीच्या कारवाईने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. आजही कारवाई सुरू आहे. या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले असून जोरदार टीकाटिप्पणी करत असताना यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अधिक भाष्य करणे टाळले आहे. फडणवीस शनिवारी नगरमध्ये आले असता पत्रकारांनी त्यांना या […]

महाविकास आघाडी सरकारबद्दल फडणवीसांचा खळबळजनक खुलासा! म्हणाले, मला अटक...

महाविकास आघाडी सरकारबद्दल फडणवीसांचा खळबळजनक खुलासा! म्हणाले, मला अटक...

Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील ईडीच्या कारवाईने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. आजही कारवाई सुरू आहे. या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले असून जोरदार टीकाटिप्पणी करत असताना यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अधिक भाष्य करणे टाळले आहे.

फडणवीस शनिवारी नगरमध्ये आले असता पत्रकारांनी त्यांना या प्रकरणावर प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले, की मला याबाबत कोणतीच माहिती नाही. मला ही माहिती माध्यमांद्वारेच मिळत आहे असे सांगत त्यांनी यावर अधिक भाष्य टाळले.

हेही वाचा : Sayara Mushrif : आम्हाला गोळ्या घाला; ईडीच्या धाडीनंतर सायरा मुश्रीफ भावूक

माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांची गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या माध्यामातून चौकशी सुरु आहे. आज पुन्हा ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी दाखल झाले.  आज पहाटेपासून त्यांच्या घरी छापेमारी सुरु झालेली आहे. गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी छापेमारी आहे. जवळपास चार ते पाच ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी तपास करत असल्याची माहिती आहे. यावरुन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले आहेत.

Hasan Mushrif : वातावरण पेटले; ईडी अधिकाऱ्यांना बाहेर न जाऊ देण्याचा मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा पवित्रा

हसन मुश्रीफांवरील या कारवाईच्या विरोधात मुश्रीफ यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुश्रीफ यांच्या घराबाहेर गर्दी केली आहे. यावेळी ते भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांना येथून बाहेर जाऊ देणार नाही, असा पवित्रा तेथील कार्यकर्त्यांनी घेतल्याने येथील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

Exit mobile version