Download App

राऊतांना धमकी देणारा व्यक्ती दारूच्या नशेत; धमकी प्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विरोधकांनी सरकावर टीकेची झोड उठविली आहे. राज्यातील दंगली आणि संजय राऊतांना धमकी यांवरून राज्य सरकारची कोंडी होत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या सगळ्या घडामोडींनंतर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस म्हणाले, संजय राऊत यांना धमकी देणारा माणूस सापडला आहे. त्याने दारूच्या नशेत राऊत यांना धमकी दिल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र हे प्राथमिक रिपोर्ट आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला जाईल. कोणीही धमकी दिली असेल तर कारवाई होईल, असे फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस यांनी आज नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

मोदींनीच चोरांची यादी जाहीर केलीय ना ? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

धमक्यांची राज्य सरकारकडून चेष्टा केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर फडणवीस म्हणाले, चेष्टा करण्याचे कारण काय, मला या गोष्टींची पूर्ण कल्पना आहे. जे कुणी चुकीचे काम करेल त्याला शासन झाल्याशिवाय राहणार नाही. हे राज्य कायद्यानेच चालेल असे त्यांनी सांगितले.

 

नेमकं प्रकरण काय ?

संजय राऊत यांच्या मोबाईलवर हा धमकीचा मेसेज आला आहे. त्यामध्ये एके ४७ ने हत्या करण्याची धमकी देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. शुक्रवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास हा मेसेज आला असून त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे.

Sanjay Raut Death Threat: मोठी बातमी! संजय राऊतांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी!

 

मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊतांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून हा धमकीचा मेसेज आला असल्याचे त्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आलं आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Musewala) प्रमाणेच दिल्लीत संजय राऊतांचीही हत्या करण्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली. यासंदर्भात संजय राऊतांनी मुंबई पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Tags

follow us