Download App

नवाब मलिकांची भूमिका गुलदस्त्यात असतानाच CM शिंदेंनी टाकला डाव; तुकाराम कातेंचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Politics : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात असलेले माजी आमदार तुकाराम काते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. काते हे अणुशक्तीनगरचे माजी आमदार असून ठाकरे गटाचे विद्यमान शाखाप्रमुखही होते.

तुकाराम काते यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी समृद्धी काते यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. समृद्धी काते या अणुशक्तीनगरच्या उपशाखाप्रमुख होत्या. मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र आणि मुंबईच्या कायापालटात योगदान देण्यासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश केल्याचे तुकाराम काते यांनी सांगितले.

बारामतीत अजित पवारांची फटकेबाजी; पण शरद पवार, सुप्रिया सुळेंवर शब्दही नाही

नवाब मलिकांविरोधात शिंदेंचा डाव :

राज्याच्या राजकारणात रोजच अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्याने महाविकास आघाडीची ताकद कमी झाल्याचे चित्र आहे. यामुळे निवडणुकांच्या तोंडावर फोडाफोडीच्या राजकारणानेही वेग घेतला आहे. अशात मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले अणुशक्तीनगरचे राष्ट्रवादीचे विद्यमान नवाब मलिक जामीनावर बाहेर आले. त्यानंतर त्यांनी अद्याप कोणतीही राजकीय भूमिका घेत जाहीर केलेली नाही.

मात्र ते शरद पवार यांच्याच पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची नेमकी भूमिका अद्याप गुलदस्त्यात असताना त्यांच्या मतदारसंघातील राजकारणाने वेग घेतला. मुख्यमंत्री शिंदे गटाने डाव टाकत नवाब मलिक आमदार असलेल्या अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तुकाराम काते यांचा आपल्या गटात प्रवेश करवून घेतला आहे. आता आगामी निवडणुकीत काते यांना तिकीट देण्याच्या दिशेने विचार सुरू केला आहे.

लाथ मारुन संजय राऊतांना बाहेर काढलं पाहिजे; शिरसाटांची खालच्या स्तरावर जाऊन टीका…

या राजकारणाने दुसरीकडे ठाकरे  (Uddhav Thackeray) गट मात्र कमालीचा भडकला आहे. कार्यकर्त्यांनी काते यांच्या संपर्क कार्यालयाला टाळे ठोकत आंदोलन केले. काते यांनी जरी शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला असला तरी सर्वसामान्य नागरिक आणि शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठिशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला. शिवसैनिकांच्या या आंदोलनामुळे मतदारसंघातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, नवाब मलिक जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांची राष्ट्रवादीतील दोन्ही गटांच्या नेत्यांनी भेट घेतली होती. त्यामुळे आता मलिक कोणत्या गटाला पाठिंबा देतील अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु, मलिक यांच्याबाबतीत मागील दिवसात घडलेल्या राजकीय घडामोडी पाहता ते अजित पवार गटाला पाठिंबा देतील याची शक्यता कमी आहे. ते शरद पवार यांच्या यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. 

Tags

follow us