Download App

जानकरांनी वाढवली महायुतीची चिंता, रासपचा विधानसभेच्या 104 जागांवर दावा

Mahadev Jankar : विधानसभा निवडणुकीत महायुतीलने आम्हाला 104 जागा सोडाव्या, अशी मागणी रासपच्या महादेव जानकर यांनी केली आहे.

Mahadev Jankar : लोकसभेनंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) तयारी सुरू केली. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय नेते मतदारसंघांचा आढावा घेत आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीनेही लोकसभेतील अपयश विसरून विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. अशातच महायुतीमधील घटकपक्ष असललेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकरांनी (Mahadev Jankar) मोठं विधान केलं. त्यांच्या वक्तव्यामुळे महायुतीची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! सरकार लवकरच सगेसोयऱ्याचा अध्यादेश काढणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती 

विधानसभा निवडणुकीत महायुतीलने आम्हाला 104 जागा सोडाव्या, अशी मागणी जानकर यांनी केली आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघात जानकर यांनी महायुतीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला. लोकसभेत पराभव झाल्यानंतर आता जानकरांनी विधानसभेसाठी जोरदार कंबर कलसी आहे. जानकर यांनी विधानसभेच्या 288 जागांसाठी तयारी सुरू केली आहे. आज माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले, आम्ही 104 जागा मागणार आहोत. ज्यावेळी महायुतीची चर्चा होईल तेव्हा काही जागा मागेपुढे होतील. पश्चिम महाराष्ट्रातच नाही तर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातही आमची ताकद आहे, तिथेही आम्ही उमेदवार उभे करू. आम्ही आमची तयारी करत आहोत. ज्याची जितकी कुवत आहे, तेवढ्या जागा मिळतील, असं जानकर म्हणाले.

…तर 288 पैकी तुमचा एकही उमेदवार निवडूण येणार नाही, भुजबळांचा उल्लेख करत जरांगेंचा थेट इशारा 

विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. आता राज्यसभेसाठी माझा विचार होईळ. महायुती माझी दखल घेईल, अंसही जानकर म्हणाले.

अकोल्यात जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा हा कमी आला. यासाठी काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. याविषयी जानकरांना विचारले असता ते म्हणाले, आमच्या वेळेस मी पिक विमा वाढून दिला होता, एवढ्या शेतकऱ्यांना कमी विमा जात असेल तर तर त्या कंपन्या कारवाई करण्यात येईल, असं जानकर म्हणाले.

follow us