महादेव जानकरांचा पुतण्याही लोकसभेच्या रिंगणात, स्वरूप जानकरांचा माढ्यातून अर्ज

महादेव जानकरांचा पुतण्याही लोकसभेच्या रिंगणात, स्वरूप जानकरांचा माढ्यातून अर्ज

Swaroop Jankar will contest Madha Lok Sabha : महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकर (Mahadev Jankar) यांचे पुतणे स्वरूप जानकर (Swaroop Jankar) हे देखील लोकसभेच्या रिंगणात उतरले आहे. स्वरुप जानकरांनी आज माढा लोकसभेसाठी (Madha Lok Sabha) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी बहुजन समाजवादी पार्ट (Bahujan Samajwadi Party) पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

WhatsApp देणार यूजर्सला सुखद धक्का! पाहता येणार ऑनलाइन यूजर्सची लिस्ट 

काही दिवसांपूर्वी परभणी येथे झालेल्या मेळाव्यात बोलतांना महादेव जानकर यांनी माझा पुतण्या राजकारणात येणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर स्वरुप जानकरांनी आपली भूमिका स्पष्ट करत आपण राजकारणात येणार असल्याचं जाहीरपणे सांगितलं होतं. शाहू, फुले आंबेडकर आणि कांशीराम यांच्या विचाराला आपण मानतो, असं म्हणत त्यांनी बहुजन समाजवादी पक्षाकडून लढणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

शरद पवार भाषण करत होते, अचानक कुणीतरी अज्ञात वस्तू फेकली; बॉडीगार्डने पकडली 

उत्तम जानकर यांच्या भूमिकेकडे मतदार संघाचे लक्ष लागलं असताना स्वरुप जानकर यांनी यांनी अर्ज भरला आहे. त्यामुळं माढ्यात नवा ट्विस्ट आला आहे.

दरम्यान, स्वरूप जानकर हे व्यवसायाने पत्रकार असून त्यांनी २०१४ मध्ये देखील माढा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

माढ्यात तिहेरी लढत
माढ्यातून महायुतीने रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीने शरद पवार गटाच्या धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी दिली आहे. तर आता स्वरुप जानकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळं इथं तिहेरी लढत होणार आहे. मोहित पाटलांसाठी शरद पवारांनी तगडी फिल्डिंग लावली आहे. उत्तम जानकरांसारखा तगडा नेता सोबत घेण्याच्या तयारीत पवार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज