शरद पवार भाषण करत होते, अचानक कुणीतरी अज्ञात वस्तू फेकली; बॉडीगार्डने पकडली

शरद पवार भाषण करत होते, अचानक कुणीतरी अज्ञात वस्तू फेकली; बॉडीगार्डने पकडली

Sharad Pawar : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अगदी कडाक्याच्या उन्हात जोरदार प्रचार सुरू झाला आहे. उमेदवारांबरोबरच दिग्गज नेतेही प्रचारात उतरले आहेत. शरद पवारही प्रचारात उतरले आहेत. काल सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शरद पवार यांची पुण्यात सभा झाली होती. त्यानंतर आज त्यांनी कन्हेरी येथे जनतेशी संवाद साधला. यावेळी सभेदरम्यान, उपस्थितांपैकी एकाने व्यासपीठाकडे काहीतरी वस्तू फेकली. परंतु, शरद पवार यांच्या मागे असलेल्या बॉडीगार्डने ती वस्तू पकडली. यावेळी त्या बॉडीगार्डच्या चेहऱ्यावरील हावभावही संतापाचेच होते.

Utkarsha Roopwate Resigned : काँग्रेसला खिंडार! उत्कर्षा रूपवते यांनी दिला पदाचा राजीनामा

या सभेत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी कन्हेरी गावााचा उल्लेख करत ग्रामस्थांची मने जिंकली. या गावातूनच निवडणुकीची सुरुवात केली असे शरद पवार सुरुवातीलाच म्हणाले. भाषण करत असताना शरद पवारांनी एका ज्येष्ठ कार्यकर्त्याला त्याच्या नावानिशी ओळखले. त्यांचं वय विचारलं. त्यांनी (पांडुरंग झगडे) 94 असं सांगितलं. त्यांचं वय ऐकताच म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही दहा वर्षांपेक्षा वडील आहात, असे पवार म्हणाले.

यानंतर पवारांनी मुख्य भाषणाला सुरुवात केली. याचवेळी सभेत उपस्थितांकडून काहीतरी वस्तू त्यांच्या दिशेने फेकण्यात आली. शरद पवार यांच्या पाठीमागे उभे असलेल्या बॉडीगार्डचे लक्ष होतेच. लागलीच त्याने ही वस्तू झेलली आणि दूर फेकून दिली. यानंतर बॉडीगार्डने संबंधितांकडे रागानेच पाहिले. बॉडीगार्डच्या शेजारी उभे असलेल्यांनीही काय झालं म्हणत आजूबाजूला पाहण्यास सुरुवात केली. परंतु, या प्रकाराकडे शरद पवारांचे फारसे लक्ष नव्हते. ते त्यांचे भाषण करत राहिले.

‘बटण कसं दाबायचं मी सांगणार नाही’, खोचक प्रत्युत्तर देत पवारांची अजितदादांवर ‘कडी’

यानंतर या घटनेची माहिती घेण्यात आली. त्यावेळी हा सगळा प्रकार लक्षात आला. संबंधित व्यक्तीने लीपर माईक त्यांच्या दिशेने फेकला होता. त्यामुळे हा काही चुकीचा प्रकार नव्हता. परंतु, माईक देण्यासाठी संबंधिताने चुकीच्या पद्धतीने प्रयत्न केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube