VIDEO: पाककडील अणुबॉम्बवर मोदींचे खास स्टाईलने उत्तर, मी स्वतः लाहोरला जावून तपासून आलोय…
Prime Minister Narendra Modi’s response to Pakistan’s nuclear bomb: देशात लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरू आहे. इंडिया आणि एनडीए आघाडीमध्ये जोरदार फाइट दिसत आहे. प्रचारात पाकिस्तानचा मुद्दा आला आहे. आपण पाकिस्तानला सन्मान दिला पाहिजे, कारण त्यांच्याकडेही अणुबॉम्ब आहे, असे वादग्रस्त विधान काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने केले होते. त्यावर एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांच्या स्टाईलने मजेशीर उत्तर दिले आहे.
Pune Car Accident : वेदांत, विशाल अन् आता आजोबा; अख्ख अग्रवाल कुटुंब चौकशीच्या फेऱ्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, असे आहे अणुबॉम्बची ताकद मी स्वतः लाहोर जावून तपासून आलो आहे. त्यावर एका पत्रकारने विचारणाही केली होती की व्हिसा नसताना मी तेथे कसा गेलो. त्यावर पत्रकार आश्चर्यचकित झाला होता. तो देश एकेकाळी माझा देश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे उत्तर एेकूण प्रेक्षकही हसले.
पाकिस्तान से डरो, क्योंकि उसके पास परमाणु बम है, देखिए इस पर पीएम मोदी ने क्या जवाब दिया…
@narendramodi | @PMOIndia @BJP4India pic.twitter.com/C0KnWkVsqX
— Shubham Rai (@shubhamrai80) May 23, 2024
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर हे नेहमीत वादग्रस्त विधान करत असतात. पाकिस्तानबाबत मणिशंकर अय्यर यांनी एका मुलाखतीत वादग्रस्त विधान केले होते. भारताने पाकिस्तानला सन्मान दिला पाहिजे. कारण शेजारच्या राष्ट्राकडे अणुबॉम्ब आहे. आम्ही त्यांचा सन्मान नाही केला तर ते भारतावर अणुबॉम्बने हल्ला करण्याचा विचार करू शकतात. भारत हे विसरत आहे की पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे.
सध्याचे सरकार हे पाकिस्तानबरोबर चर्चा करत नाही. कारण ते आपल्या देशात दहशतवादी पाठवत आहे. दहशतवाद संपविण्यासाठी दोन्ही देशात चर्चा करणे आवश्यक आहे. भारत हा अहंकारी देश असल्याचा विचार पाकिस्तान करेल. हा देश आम्हाला छोटा समजत आहे. अशावेळी पाकिस्तानमधील कुणीही वेडा व्यक्ती अणुबॉम्बचा उपयोग करेल, असे विधान अय्यर यांचे होते. यावरून काँग्रेसच्या नेत्यांनीही अय्यर यांना झापले होते. तर भाजप नेत्यांनी काँग्रेसला घेरले होते.
इस्त्रायलला दुसरा झटका! ‘या’ देशाची पॅलेस्टाइनला साथ, सुरू करणार दूतावास