इस्त्रायलला दुसरा झटका! ‘या’ देशाची पॅलेस्टाइनला साथ, सुरू करणार दूतावास

इस्त्रायलला दुसरा झटका! ‘या’ देशाची पॅलेस्टाइनला साथ, सुरू करणार दूतावास

Israel News : हमास या दहशतवादी संघटनेचा नायनाट करण्यासाठी युद्धात उतरलेल्या इस्त्रायलला दोन दिवसांत दोन झटके बसले आहेत. कोलंबिया या देशाने पॅलेस्टाईनच्या शहरात दूतावास सुरू करण्याची घोषणा केली आहे. या युद्धात कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्त्रायलवर आधीच सडकून टीका केली आहे. त्यानंतर आता कोलंबियाने पॅलेस्टाईनमध्ये थेट दूतावास सुरू करण्याची घोषणा केली आहे. विदेश मंत्री लुइस मुरिल्लो यांनी सांगितले की राष्ट्रपती गुस्तावो पेत्रो यांनी आदेश दिले आहेत की पॅलेस्टाईनमध्ये दूतावास सुरू करण्यात येईल.

स्पेन, आयर्लंड आणि नॉर्वे यांनी पॅलेस्टाईनला मान्यता देण्याची घोषणा केल्यानंतर कोलंबियाने हा निर्णय घेतला आहे. या तीन देशांचं म्हणणं आहे की ते पॅलेस्टाइनला मान्यता देतील. 28 मे रोजी कॅबिनेट बैठक होईल त्यात पॅलेस्टानला मान्यता देण्याचा प्रस्ताव मंजूर केला जाईल असे नॉर्वे सरकारने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत जगातील 142 देशांनी पॅलेस्टाइनला मान्यता दिली आहे.

Israel attack on Gaza : गाझावर इस्त्रायलचे पुन्हा हल्ले, राफा शहरातवर केलेल्या हल्ल्यात 18 ठार

इस्त्रायल कुणाचाही विचार न करता युद्ध सुरुच ठेवले आहे. गाझातील राफा शहरावर तुफान हल्ले केले जात आहेत. अमेरिकेनेही यावर काळजी व्यक्त केली होती. आता मात्र यु टर्न घेत इस्त्रायलच्या प्लॅनवर समाधानी असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांनी सांगितले की राफात काय प्लॅन आहे याची माहिती इस्त्रायलने आम्हाला दिली आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की राफामध्ये सर्वसामान्य लोकांना कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेतली जाणार आहे. या भागातून बाहेर पडण्यासाठीही व्यवस्था केली जाणार आहे. तसेच येथे राहणाऱ्या लोकांसाठी आवश्यक मदतही दिली जाणार आहे.

दरम्यान, इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या आठ महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. त्यामुळं इजिप्तच्या सीमेजवळील राफा शहरावर इस्रायल जवळजवळ दररोज हवाई हल्ले करत आहे, जेथे गाझाच्या 2.3 दशलक्ष लोकांपैकी अर्ध्याहून अधिक लोकांनी आश्रय घेतला आहे. इस्रायलने राफाच्या निवासी भागाला लक्ष्य केले. युनायटेड स्टेट्ससह इतर देशांनी संयम ठेवण्याचे आवाहन करूनही इस्रायल या शहरावर लष्करी कारवाई वाढविण्यावर ठाम आहे.

इस्त्रायलचा पलटवार! क्षेपणास्त्र डागत इराणवर तुफान हल्ला; स्फोटांच्या आवाजाने शहरं हादरली 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज