इस्त्रायलचा पलटवार! क्षेपणास्त्र डागत इराणवर तुफान हल्ला; स्फोटांच्या आवाजाने शहरं हादरली

इस्त्रायलचा पलटवार! क्षेपणास्त्र डागत इराणवर तुफान हल्ला; स्फोटांच्या आवाजाने शहरं हादरली

Iran Israel Conflict : इराणने हल्ला केल्यानंतर इस्त्रायल चवताळून उठला (Iran Israel Conflict) आहे. या हल्ल्यानंतर इस्त्रायल फार दिवस शांत बसणार नाही असे सांगितले जात होते. त्याचा प्रत्ययही थोड्याच दिवसांत आला. इस्त्रायलच्या सैन्याने शुक्रवारी सकाळी क्षेपणास्त्रांच्या मदतीने इराणवर मोठा हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात इस्त्रायलने इराणच्या अणुकेंद्रांना लक्ष्य करत क्षेपणास्त्रे डागली. इराणमधील इस्फाहान शहरात स्फोटांचे आवाज ऐकू आले. हा हल्ला इस्त्रायलनेच केला असा दावा इराणच्या सरकारी वृत्तवाहिन्यांकडून केला जात आहे. दरम्यान, इराणने आधी इस्त्रायलवर हल्ला केला होता. त्याचे तीव्र पडसाद जगभरात उमटले होते. पश्चिमात्य देशांनी इराणवर कठोर टीका केली होती.

Iran Israel Conflict : इस्त्रायलवरील हल्ला इराणला भोवणार; कठोर निर्बंधांचा अमेरिकी प्लॅन तयार

याआधी इस्त्रायलने सीरियातील इराणच्या दूतावासावर एअरस्ट्राइक केला होता. त्यामुळे पश्चिम आशियात तणाव वाढला होता. यानंतर मागील आठवड्यात इराणने जोरदार प्रत्युत्तर दिले. शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीने तुफान हल्ला केला होता. या हल्ल्यात इस्त्रायलचे फार नुकसान झाले नाही. मात्र जगभरात पडसाद उमटले. अमेरिकेसह अनेक देशांनी इराणवर कठोर टीका केली. अमेरिकेने तर कठोर निर्बंध लादण्याची घोषणाही केली. इस्त्रायलने संयम बाळगावा असे आवाहन त्याच्या मित्रदेशांनी केले होते.

मात्र, इस्त्रायलचे राज्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांना इराणला प्रत्युत्तर द्यायचे होते. इराणला कधी आणि केव्हा उत्तर द्यायचे हे आम्ही ठरवू असा इशारा इस्त्रायलने दिला होता. अखेर ही संधी आज चालून आली. नियोजन करत इस्त्रायली सैन्याने इराणवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा आता केला जात आहे. इस्त्रायलने इराणच्या अणुकेंद्रावर तीन क्षेपणास्त्रे डागल्याचे सांगण्यात येत आहे.

इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, इस्फाहान शहरातील विमानतळ परिसरात स्फोटांचे आवाज ऐकू आले. याच शहरात इराणची दोन अणुकेंद्रे आहेत. इराणमधील सर्वात मोठा युरेनियम संवर्धन प्रकल्पही याच शहरात आहे. या हल्ल्यानंतर अनेक विमानांचे उड्डाण पर्यायी मार्गांवरून वळवण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर इराण सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.

Iran vs Israel Military Power: इराण-इस्रायलमध्ये युद्ध पेटलं तर कोणाकडे किती लष्करी ‘पावर’?

अमेरिका कठोर निर्बंधांतून करणार इराणची कोंडी 

इराणच्या मिसाइल आणि ड्रोन प्रोग्रामवर आम्ही कठोर निर्बंध लादणार आहोत. याबाबत आम्हाला आमच्या सहकाऱ्यांकडूनही मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. याबाबत अधिक माहिती देताना सुलिवन म्हणाले, नवीन निर्बंध आणि अन्य उपाययोजना इराणची लष्करी क्षमता आणि परिणामकारकता रोखण्यासाठी निर्बंध टाकणार आहोत. आम्ही इराणवर दबाव टाकत राहू. अमेरिकेने मागील तीन वर्षांत क्षेपणास्त्रे आणि ड्रोन संबंधित निर्बंधांसोबतच दहशतवादाशी संबंधित 600 हून अधिक व्यक्त आणि संस्थांवर निर्बंध लादले आहेत, याचीही त्यांनी यानिमित्ताने आठवण करून दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube