Israel Palestine War : गाझातील नागरिकांना 3 तासांची डेडलाईन; इस्त्रायलने नेमकं काय केलं ?

Israel Palestine War : गाझातील नागरिकांना 3 तासांची डेडलाईन; इस्त्रायलने नेमकं काय केलं ?

Israel Palestine War : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्ध (Israel Palestine War) अजूनही सुरुच आहे. हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलमध्ये रॉकेट हल्ले करत युद्धाला सुरुवात करून दिली. त्यानंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. आता इस्त्रायलने येथील पाणी, इंधन, वीज पुरवठा सगळं काही बंद केले आहे. युद्धाचा आज नववा दिवस आहे. या घडामोडींदरम्यान आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्त्रायलच्या संरक्षण दलाने गाझा शहर आणि उत्तर गाझा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना तीन तासांचा वेळ दिला आहे. येथील रहिवाशांनी सकाळी 10 ते दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान उत्तर गाझातून तत्काळ दक्षिण गाझाच्या दिशेने निघून जावे. सुरक्षिततेच्या कारणामुळे ठरवून दिलेल्या मार्गावर इस्त्रायलकडून हल्ले केले जाणार नाहीत, असे इस्त्रायलने स्पष्ट केले आहे.

याबाबत इस्त्रायलच्या संरक्षण दलाने ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. गाझामध्ये सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत कोणतेही ऑपरेशन लाँच केले जाणार नाही. यावेळेत येथाील नागरिकांनी दक्षिण गाझा परिसरात सुरक्षितपणे निघून जावे. या वेळेनंतर मात्र इस्त्रायली लष्कर तीव्र कारवाईला सुरुवात करील असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. तुमची आणि तुमच्या कुटुंबाची सुरक्षा महत्वाची आहे. त्यामुळे आमच्याकडून दिल्या जात असलेल्या सूचनांचे पालन करा आणि दक्षिणेकडे निघून जा. हमासच्या नेत्यांनी याआधीच त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली आहे. त्यामुळे आता तुम्ही तुमची काळजी घ्या, असे इस्त्रायलच्या संरक्षण दलाने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अमेरिकेची मदत तर रशियाची धमकी

या युद्धात अमेरिका इस्त्रायलच्या बाजून युद्धात उतरला असून मदतही सुरू केली आहे. त्यामुळे इस्त्रायलचं बळ वाढलं आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचा कट्टर शत्रू रशिया विरोधात भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इस्त्रायलने गाझावर जमिनीवरून हल्ले केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता. त्यामुळे हे युद्ध अधिकच चिघळत चालले आहे.

Israel Palestine War : मृत्यूचं तांडव! युद्धात 4500 बळी, जखमी 12 हजार पार

इस्त्रायलचा प्लॅन नेमका काय ?

इस्त्रायलने या युद्धात आता आधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. गाझा शहराचा ताबा घेण्यासाठी आणि गाझा पट्टी उद्धवस्त करण्यासाठी 10 हजार सैन्य पाठविण्याची योजना आखण्यात आली आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, इस्त्रायली लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. 2006 च्या लेबनॉन युद्धानंतरचं हे सर्वात मोठं युद्ध असेल असे या अहवालात म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube