Amit Shah Devendra Fadnavis Meeting In Delhi : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत. (Maharashtra Politics) दरम्यान बुधवारी 11 डिसेंबर रोजी उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
आंंबेडकरी वस्त्यांमधलं कोम्बिंग ऑपरेशन तत्काळ थांबवा; आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना फोन…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. तर या भेटीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षांना देण्यात येणाऱ्या खात्यांबद्दल देखील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय. तर येत्या 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार केला जाऊ शकतो, अशी शक्यता आहे.
आंंबेडकरी वस्त्यांमधलं कोम्बिंग ऑपरेशन तत्काळ थांबवा; आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना फोन…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहखात्याची मागणी केलेली आहे, परंतु भाजपा त्यांना गृहखात देण्यास तयार नसल्याचं सांगण्यात येतंय. भाजप मुख्यमंत्रिपदासह 21 किंवा 22 मंत्रिपदे स्वत:कडे ठेवण्याची शक्यता आहे. यामध्ये 4 ते 5 मंत्रिपदे रिक्त ठेवली जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ खातेवाटपावरून चर्चेला उशीर होत असल्याची देखील माहिती मिळतेय. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कमाल 43 मंत्री होऊ शकतात, अशी माहिती पीटीआयने दिली आहे.
STORY | Maharashtra cabinet expansion likely by Dec 14; Fadnavis to meet PM in Delhi
Read: https://t.co/5GJdLkLEeh pic.twitter.com/LBMEPzECoy
— Press Trust of India (@PTI_News) December 11, 2024
हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून नागपूरमध्ये अधिवेशन होणार आहे. परंतु त्याअगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेलेत. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून फडणवीस परतणार आहे. त्यानंतर याठिकाणी महायुतीच्या नेत्यांची पुन्हा बैठक होईल. यामध्ये मंत्रिपदे आणि खातेवाटपाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली.