आंंबेडकरी वस्त्यांमधलं कोम्बिंग ऑपरेशन तत्काळ थांबवा; आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना फोन…

आंंबेडकरी वस्त्यांमधलं कोम्बिंग ऑपरेशन तत्काळ थांबवा; आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना फोन…

Prakash Ambedkar News : परभणीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या (Constitution) प्रतीची विटंबना केल्याप्रकरणी परभणीमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. या घटनेविरोधात आंबेडकरी अनुयायांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून आज हिंसाचार उफाळल्याचं दिसून आलं. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलिस महानिरीक्षकांना फोन करुन आंबेडकरी वस्त्यांमधलं कोंबिग ऑपरेशन तातडीने थांबवण्याचं आवाहन केलंय. यासंदर्भातील ट्विट आंबेडकरांनी केलंय.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नांदेड विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याशी दोनवेळा फोनवर संपर्क साधला आहे. तसेच आंबेडकरी वस्त्यांमध्ये सुरू असलेले कोंबिग ऑपरेशन तातडीने थांबविण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व समाजकंटकांना अटक करा, अन्यथा तर पुढील दिशा ठरवली जाईल असा इशारा ॲड. आंबेडकर यांनी ट्विटद्वारे दिला आहे.

शिंदेंना गृहमंत्रीपद नाहीच! मंत्रिमंडळ विस्तारासाठी जुनाच फॉर्म्युला, कोणतं खातं कोणाला मिळणार?

तसेच या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बोलणे झाले आहे. दलितांच्या विरोधात सुरू असलेल्या अटका आणि दलित वस्तीवर सुरू असलेले कोम्बिंग ऑपरेशन तत्काळ थांबवावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केलीयं. तसेच आंबेडकर यांनी सर्व दलित आणि संविधानवादी जनतेला शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत संविधानाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना अटक झाली नाही, तर आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, असा इशाराही आंबेडकर यांनी दिला आहे.

परभणीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तिकेची विटंबना करण्यात आल्याचा प्रकार काल घडलायं. या घटनेच्या परभणीतील आंबेडकरी अनुयायांकडून संताप व्यक्त केला जात असून निषेध व्यक्त करण्यासाठी अनुयायी रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांकडून परभणी बंदची घोषणा देण्यात आली असून ठिक-ठिकाणी टायर जाळून निषेध केला जात आहे.

बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, दरम्यान आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाचे प्रतिकात्मक पुस्तक फाडल्याच्या निषेधार्थ लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी घोषणाबाजी करत टायर पेटवून परभणी नांदेड महामार्ग रोखून धरला. मराठवाड्यातील परभणीत संविधान पुस्तिकेच्या विटंबनेनंतर जमाव आक्रमक झाल्याचं दिसतंय. पोलिसांच्या गाडीवर देखील दगडफेक झाली. काही गाड्यांची मोडतोड देखील आंदोलकांनी केलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube