Download App

‘खेकडा गुणकारी प्राणी, त्याला सांभाळलं असतं तर’.. गुलाबरावांचा ठाकरेंना खोचक टोला

Gulaberao Patil replies Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांना खेकड्याची उपमा देत माझं सरकार वाहून गेलं नाही तर खेकड्यांनी फोडलं अशी घणाघाती टीका केली. या टीकेवर आता शिंदे गटाचे आमदार व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे.

खेकडा हा अत्यंत गुणकारी प्राणी आहे. ज्याला कावीळ झालेली असते, त्यांच्यासाठी खेकडा हा प्राणी फार गुणकारी असतो. त्याला चांगलं सांभाळलं तर कदाचित धरण फुटलं नसतं, असा टोला पाटील यांनी लगावला. पाटील पुढे म्हणाले, बाळासाहेबांचे विचार निश्चितपणे त्यांच्याकडे आहेत. हे ते जर मान्य करत असतील तर आपण कुणाबरोबर युती करत आहोत आणि आपल्या बाजूला कोण बसलंय हे पाहणे गरजेचे आहे.

मातोश्रीवर तुमच्यासमोर झुकत होतो का? संजय शिरसाटांचा ठाकरेंना उपरोधिक सवाल…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीवर प्रतिक्रिया देताना उठसूट दिल्लीला मुजरा मारणं आपली संस्कृती नाही असा टोला ठाकरेंनी लगावला होता. त्यावर पाटील यांनी भाष्य केले. आपण ज्यावेळी मुख्यमंत्री होतात तेव्हा दिल्लीला जात होतात. पण त्याला आम्ही मुजरा मारणं असं म्हणणार नाही. आपण रामराम करायला जात होतात, असे पाटील म्हणाले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले ?

2019 मध्ये उद्धव ठाकरेंनीच पाठीत खंजीर खुपसल्याचे विधान देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यावरही ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले. आम्ही खंजीर खुपसला मग राष्ट्रवादीने काय खुपसले की तुम्ही त्यांच्यासोबत गेला. रोज उठसूट दिल्लीला मुजरा मारणे ही आपली संस्कृती नाही, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टोला लगावला.

किंगमेकर किंग होतो तेव्हा सगळे मिळून त्याची वाट लावतात, विखेंची ठाकरेंवर टीका

आवाज महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा या शीर्षकाखाली ही मुलाखत दोन भागांत प्रसारित करण्यात येणार आहे. बुधवारी पहिला आणि गुरुवारी दुसरा भाग प्रसारित करण्यात येणार आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने शिवसेनेच्या यु ट्यूब चॅनेलवर हा पॉडकास्ट सुरू करण्यात आला आहे. लोकांच्या मनातले प्रश्न तसेच राज्याच्या भविष्याचे विचार.. आता या आवाज कुणाचा शिवसेना ठाकरे गटाच्या पॉडकास्टमधून ऐकायला मिळणार आहे.

Tags

follow us