Bacchu kadu replies Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत कलावती बांदूरकर यांच्याबाबत खोटी माहिती दिल्याचे खुद्द कलावती बांदूरकर यांनीच माध्यमांसमोर सांगितले. मोदींच्या सरकारने मला काहीच दिलं नाही. अमित शाह यांनी संसदे माझ्याबाबत खोटी माहिती दिली, त्यांच्यावर पंतप्रधान मोदींनी कारवाई करावी अशी मागणी कलावती यांनी केली आहे. त्यानंतर या मुद्द्यावर राज्यातील सत्ताधारी पक्षातील आमदार बच्चू कडू यांनीच भाजपला घरचा आहेर दिला आहे.
अमित शाह यांनी खोटं बोलणं हा चिंतेचा मुद्दा असून यामुळे भाजपाचेच नुकसान होईल. बांदूरकरांबाबत पहिल्यांदा राहुल गांधींनी मुर्खपणा केला. आता अमित शाह यांनी त्याहीपेक्षा जास्त मुर्खपणा केला. शाह लोकसभेत जे काही बोलले, ते सर्व खोटे बोलले. शाह यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीने विचारपूर्वक बोलायला पाहिजे. शाह यांच्या वक्तव्यामुळे भाजप अडचणीत येत आहे. प्रत्येक गोष्ट भाजप खोटेच बोलतो असा प्रचार होत आहे.
लोकसभेतील अमित शाहांचे सर्व दावे खोटे; राहुल गांधींच्या मदतीसाठी ‘कलावती बांदूरकर’ मैदानात
गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत अविश्वास प्रस्तावावेळी बोलताना कलावती यांचा उल्लेख केला होता. राहुल गांधी यांनी भेट दिलेल्या कलावती यांना मोदी सरकारनेच सर्व सुविधा दिल्याचा दावा शाह यांनी केला होता. पण, शाह लोकसभेत खोटं बोलले. मला मोदी सरकारकडून काहीच मदत मिळाली नाही. राहुल गांधी यांनीच सगळी मदत केली, असा खुलासा कलावती बांदुरकर यांनीच केला होता. यानंतर त्यांनी आता अमित शाह यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना अनेक मुद्द्यांवरून घेरले. कलावतीचा उल्लेख करत अमित शाह यांनी राहुल यांच्यावर निशाणा साधला. शाह म्हणाले की, राहुल गांधी कलावती यांच्या घरी जेवणासाठी गेले होते. त्यांच्या सरकारने (UPA) कलावतींसाठी काहीही केले नसून या उलट मोदी सरकारने कलावतींना घर, वीज आणि धान्य दिल्याचा उल्लेख केला होता.
काय भाषणं करायचे? पण मंत्रीपद अन् ‘हरहर मोदी’…; संदीप क्षीरसागरांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
अमित शाह यांनी कलावती यांच्यासंदर्भात खोटी माहिती दिली. केवळ खोटे बोलण्याशिवाय त्यांना काहीच येत नाही. दुसऱ्यांच्या कर्तुत्वावर आपली पाठ थोपटून घेण्याचा हा प्रकार आहे. नऊ वर्षांच्या काळात कोणतेही काम, विकास केला नाही. कलावती या राहुल गांध घरी आल्यानंतरच शासकीय मदत मिळाल्याचे सांगत आहेत. यावरून कलावती यांना भाजपने नाही तर काँग्रेसनेच मदत केल्याचे स्पष्ट होत आहे, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.