Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance : आगामी महापालिका निवडणुकांच्या (Municipal elections) पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वाढत चाललेल्या भेटी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेने (MNS) युती करत बेस्ट कामगार पतपेढीची निवडणूक (BEST Workers Credit Union Election) एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला.
राज्यातील ज्योतिर्लिंगांच्या विकास आराखड्यांना वेग; अंमलबजावणीसाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती
बेस्ट कामगार पतपेढीची निवडणूक येत्या १८ ऑगस्ट रोजी होणार आहे. ही निवडणूक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीचं एक पोस्टर समोर आलंय. या पोस्टरवर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे फोटो आहेत. तसेच काही पदाधिकाऱ्यांचेही फोटो आहेत. बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्यात या युतीबाबत गेल्याा काही दिवसाांपासून चर्चा सुरू होती. अखेर वरिष्ठांच्या आदेशानुसार, दोन्ही संघटनांनी बेस्ट पतपेढीची निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा केली.
धक्कादायक! सिद्धू मूसेवालाच्या पुतळ्यावर केला गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई गँगने दिला गंभीर इशारा
बेस्टचे बहुतेक कामगार पुढारी, युनियनचे पदाधिकारी बेस्टच्या बाहेर शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून परिचित आहेत. तर कित्येक पदाधिकारी दोन्ही पक्षांशी संबंधित आहे. दरम्यान, बेस्टची पतपेढी निवडणूक ही मुंबई महानगरपालिका निवडणुकीची नांदी समजली जात आहे. त्यामुळे बेस्टमधील ठाकरे बंधूंच्या युतीला खूप महत्त्व प्राप्त झालं.
बेस्ट पतपेढीमध्ये सध्या उद्धव ठाकरेंच्या बेस्ट कामगार सेनेची सत्ता आहे. गेल्या नऊ वर्षात बेस्ट कामगार सेनेच्या संचालक मंडळाने केलेल्या कामगार कल्याणकारी कामांमुळे कामगारांचा प्रचाराला उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोबत आल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या बेस्ट कामगार सेनेची ताकद वाढली आहे. याच पतपेढीच्या निवडणुकीत सकारात्मक परिणाम होईल यात शंका नाही, असा विश्वास बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत यांनी व्यक्त केला.