MNS Attacks NCP Over Gautam Adani Case : मनसे ही भाजपची (BJP) बी टीम असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सातत्याने करत असताना आता अदानी प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवरून असाच आरोप मनसेने (MNS) राष्ट्रवादीवर केला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच भाजपची बी टीम असल्याचे म्हटले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच उद्योगपती गौतम अदानी यांच्यापेक्षा आपल्यासमोर अन्य महत्वाचे अनेक प्रश्न आहेत. असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे अदानी प्रकरणारवर रान उठवणाऱ्या काँग्रेसलाही मोठा धक्का बसला होता.
Dhananjay Munde : पंचनामे कुठपर्यंत आलेत सरकार सांगेल का?, धनंजय मुंडे यांचा सवाल
पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण ढवळून निघाले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत यामुळे मतभेद निर्माण होत असल्याचीही चर्चा आहे. तसेच या वक्तव्यावर कालपासून जोरदार राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.
आता मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादीला घेरले आहे. देशपांडे ट्विट करत राष्ट्रवादीला भाजपची बी टीम म्हटले आहे.
‘अदानी प्रकरणात राष्ट्रवादीने घेतलेला यु टर्न म्हणजे भाजपने लिहीलेली स्क्रिप्ट आहे का ? की दुसऱ्यांना भाजपची बी टीम आहे असे आरोप करणारे स्वतःच बी टीम झाले आहेत’, असे ट्विट देशपांडे यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल एका कार्यक्रमात हिंडेनबर्ग अहवालानंतर गौतम अदानींवर (Gautam Adani) झालेल्या आरोपाप्रकरणी मोठे वक्तव्य केले होते. या प्रकरणात जेपीसी ऐवजी सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेली समितीच जास्त योग्य असल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने अदानींच्या चौकशीसाठी जेपीसी नियुक्त करण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेससह अन्य पक्षांना मोठा धक्का बसला आहे.