Maharashtra Political : राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जे काही घडलं त्याबद्दल आता भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात 2019 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने केलेली युती किंवा युतीचा निर्णय ही एक चूकच होती, असे तावडे म्हणाले. मुंबई तकने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात तावडे यांनी हा गौप्यस्फोट केला. त्यांच्या या वक्तव्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या कार्यक्रमात त्यांना 2019 मधील विधानसभेची निवडणूक युती करून लढणे ही चूक होती का? एकटे लढले असते तर जास्त फायदा झाला असता का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तावडे म्हणाले, काही जणांचं म्हणणं होतं की युती करावी तर काही जण म्हणत होते की युती करू नये. पण मला वाटते की युती करण्याची काहीच गरज नव्हती. अडचण अशी होती की शिवसेनेला दुय्यम भूमिका बजावणं त्रासाचं होतं. खूप त्रासाचं होतं. त्यांच्या लिडरशीपलाही हे पटण्यासारखं नव्हतंच. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका असोत किंवा आणखी कोणत्या जागावाटपात एक तरी जागा आम्हाला जास्त राहू द्या, असा त्यांचा माइंडसेट होता. त्यामुळे दुय्यम भूमिका त्यांनी कधीच चालणारी नाही, असे तावडे म्हणाले.
Ahmednagar Loksabha: राष्ट्रवादीची डोकेदुखी? काँग्रेसने अहमदनगरवर दावा ठोकला !
2019 ला युती केल्यानंतर शिवसेना या पद्धतीने दगाफटका करेल याची कल्पना भाजपला नव्हती. यामुळे त्यांचा तत्कालीक फायदा झालाही असेल पण, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे जे वाक्य होते की दिलेला शब्द पाळायचा. तेच उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये मोडले. याची शिवसेनेच्या मतदारांमध्ये खूप चर्चा आहे.
राजकारणात सामाजिक कामाला कुणी येत नाही
महाराष्ट्रात 181 शिवसेना लढणार आणि भाजप 79 जागा लढणार असं पहिल्या वेळेला झालं होतं. नंतर 108 त्यानंतर 171 असं जागावाटप झालं. आता 108 जागा लढल्या आणि उरलेल्या जागा लढल्याच नाहीत. शेवटी येथे कुणी सामाजिक काम करायला येत नाही त्यालाही काही राजकीय महत्वाकांक्षा असतात.
काँग्रेसला लोक कंटाळले म्हणून पंजाबात आप जिंकली
पंजाबमध्ये आम आदमी पार्टी का जिंकली तर तिथला मतदार काँग्रेस आणि अकाली दलाला कंटाळला होता. भाजप येथे कुठे लढलाच नव्हता. आम आदमी पार्टी आल्यानंतर भाजप येथे सगळ्या जागांवर लढला. आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र यांसारख्या राज्यात 15 ते 20 वर्षे भाजपला दुय्यम भूमिका पार पाडावी लागली.त्यामुळे खूप कमी जागांवर लढावे लागले. त्यानंतर स्वबळावर लढलो. आणि महाराष्ट्रात 100 पेक्षा जास्त जागा आल्या. बिहारमध्येही याच पद्धतीने आम्ही जिंकू असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला.