Ahmednagar Loksabha: राष्ट्रवादीची डोकेदुखी? काँग्रेसने अहमदनगरवर दावा ठोकला !

  • Written By: Published:
Ahmednagar Loksabha: राष्ट्रवादीची डोकेदुखी? काँग्रेसने अहमदनगरवर दावा ठोकला !

Ahmednagar Loksabha: राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगर लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे. नुकताच मुंबईत झालेल्या बैठकीत इच्छुकांची यादी समोर आली होती. आज मुंबईत काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात शिर्डी व अहमदनगर लोकसभेचा आढावा घेण्यात आला. स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसकडे घेण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. मागील वेळेस काँग्रेस राष्ट्रवादीकडे ही जागा मागत होते. आता पुन्हा काँग्रेसकडून या जागेवर दावा करण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

2024 च्या निवडणुकीचे निकाल काय? राहुल गांधींनी केलं मोठं भाकीत

मुंबईतील टिळक भवन येथील प्रदेश कार्यालयात लोकसभेची आढावा बैठक झाली. यावेळी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री अमित देशमुख, सतीश उर्फ बंटी पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, माजी मंत्री नसीम खान आदींसह प्रमुख नेते उपस्थित होते. नगर

जिल्ह्यातून आमदार लहू कानडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अनिल चुडीवाला, प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, उत्कर्षा रूपवते, करण ससाणे, विनायक देशमुख उपस्थित होते.

अहमदनगरची जागा काँग्रेसकडे घेऊन महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांना उमेदवार करावे, अशी मागणी यापूर्वीच शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली होती. कार्यकर्त्यांच्या भावना मुंबईतील बैठकीत राज्याच्या नेत्यांसमोर मांडण्यात आल्या आहेत. दक्षिण लोकसभा काँग्रेस लढत नाही. सहा विधानसभांपैकी एकही जागा काँग्रेस लढत नाही. दक्षिणेमधील कार्यकर्त्यांना बळ द्यायचे असेल तर या विभागातून काँग्रेसचे किमान दोन आमदार असणे आवश्यक आहे. नगर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे.

IAS तुकाराम मुंडे यांची पुन्हा बदली; सत्तारांच्या मंत्रालयातून एका महिन्यात उचलबांगडी

त्यामुळे सहा विधानसभा मतदारसंघांपैकी किमान एक मतदार संघ हा काँग्रेसकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये पक्षाने जागा वाटपात घेतला पाहिजे, अशी मागणी किरण काळे यांनी केली आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी देखील अहमदनगर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा अशी भूमिका नेतृत्वासमोर मांडली आहे. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी देखील यावेळी तसा आग्रह नेत्यांसमोर धरला आहे.


बारावेळा काँग्रेसचा खासदार

अहमनगरमधून काँग्रेसचा उमेदवार महाविकास आघाडीच्या माध्यमातून शतप्रतिशत निवडून येऊ शकतो, असा दावा काँग्रेस नेत्यांनी करत काही आकडेवारीसमोर आणली आहे. आजपर्यंत झालेल्या १८ लोकसभा निवडणुकांपैकी १२ वेळा काँग्रेसचा खासदार झाला आहे. म्हणजेच सुमारे ४६ वर्ष या मतदारसंघातून निवडून आला आहे. शिवसेना व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक अपवाद वगळता ४ वेळा भाजपचा खासदार झाला असल्याची आकडेवारी नाही.

शिर्डी मतदारसंघ कुणाला ?

शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटात गेले आहेत. या जागेवर उद्धव ठाकरे गट दावा करत आहे. आतापर्यंत राखीव असलेल्या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेस उमेदवार देत असते. महाविकास आघाडी असल्यामुळे या जागेचा वाद निर्माण होऊ शकते. ठाकरे गटाकडे स्थानिक सक्षम उमेदवार नाही. उत्तरेत सहापैकी पाच आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत. काँग्रेसने ही जागा लढवलीच पाहिजे. शिवसेनेकडे स्थानिक उमेदवार नसल्यामुळे आयात उमेदवारासाठी हा मतदारसंघ काँग्रेसने सोडू नये, अशी आग्रही मागणी यावेळी उत्कर्षा रूपवते, करण ससाणे, हेमंत ओगले यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube