Download App

Jayant Patil : अजितदादांनी दिला बक्कळ निधी; जयंत पाटील म्हणाले, मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून…

Jayant Patil : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी बंडखोरीत साथ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना २५ कोटींचा बक्कळ निधी दिला. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांची नाराजी उफाळून येणार नाही याची काळजी घेत त्यांच्या वाट्याचा निधी त्यांना देऊन टाकला.

विशेष म्हणजे, अजित पवारांना टोकाचा विरोध करणारे तसेच बंडाच्या काळात अजित पवार गटातील आमदार, पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणारे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्याही मतदारसंघांसाठी अजितदादांनी निधी दिला आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे. ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादीच्या आमदारांना गिफ्ट, शिंदे गटालाही केलं खूश; अजितदादांनी दिला कोट्यवधींचा निधी

‘मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून काही वर्षे काम केलं आहे. त्यामुळे मला याचं कौतुक आहे. पुरवणी मागण्या ४६ हजार कोटींपर्यंत गेल्या खरंच, एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकार मागण्या मान्य करू शकते. मागेल त्याला, पाहिजे त्याला निधी मिळतोय याचं कौतुक आहे. लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघात निधी मिळाला तर थोडी खुशी राहणारच ना’, असं जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, अजित पवार यांच्या या निर्णयामुळे निधी मिळण्याची वाट पाहणारे आमदा खूश झाले आहेत. शिंदे गटाच्या नेत्यांचीही नाराजी घालविण्यात यश मिळवले आहे. अजित पवार यांना बंडखोरीत ज्या आमदारांनी साथ दिली त्यांच्या मतदारसंघांतील विकासकामांसाठी २५ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त निधी मंजूर केला आहे. विधीमंडळात सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये भाजप-शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघांतील विकासकामांसाठी दीड हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीवाटपात शिंदे गटाच्या आमदारांचीही काळजी घेण्यात आली आहे.

मनसेचं खळ्ळखट्याक! अमित ठाकरेंची गाडी अडविल्याने फोडला समृद्धी हायवेवरील टोला नाका

 

Tags

follow us

वेब स्टोरीज