Nitin Gadkari Statment That Politics Is Sea Of Unsatusfied Soul : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Politics) निकाल जाहीर होऊन 10 दिवस झालेत, तरी अद्याप मुख्यमंत्र्यांचा चेहरा स्पष्ट झालेला नाही. नव्या सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी होणार असल्याचं भाजप नेत्यांकडून जाहीर करण्यात आलंय. त्या पार्श्वभूमीवर तयारी देखील सुरू झालीय. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या एका वक्तव्याची चर्चा होत आहे. राजकारण म्हणजे असंतुष्ट आत्म्यांचा समुद्र असं त्यांनी म्हटलंय. ते म्हणाले की, येथील प्रत्येक व्यक्ती दुःखी आहे, त्याला सध्याच्या पदापेक्षा उच्च पदाची आकांक्षा आहे.
नुकताच नागपूरमध्ये ’50 गोल्डन रुल्स ऑफ लाइफ’ या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. ते (Nitin Gadkari Statment) म्हणाले की, जीवन हा तडजोडी, अडचणी, मर्यादा आणि विरोधाभासांचा खेळ आहे. एखादी व्यक्ती कौटुंबिक, सामाजिक, राजकीय किंवा कॉर्पोरेट क्षेत्रातील असेल तर त्याचे जीवन आव्हानांनी भरलेले असते.
भाजपच्या रणनीतीप्रमाणे काम करा; आगामी निवडणुकांसाठी ठाकरेंच्या कडक सूचना
राजस्थानमध्ये आयोजित कार्यक्रमाची आठवण करून देताना नितीन गडकरी म्हणाले की, राजकारण हा असंतुष्ट आत्म्यांचा समुद्र आहे, जिथे प्रत्येकजण दुःखी आहे. जो नगरसेवक होतो, त्याला आमदार होण्याची संधी मिळाली नाही याचं दु:ख आहे. तर एका आमदाराला मंत्रिपद न मिळाल्यानं तो दु:खी आहे. ते पुढे म्हणाले की, “एखाद्या मंत्र्याला चांगलं खातं मिळालं नाही, तो मुख्यमंत्री होऊ शकला नाही म्हणून नाराज आहे. तर हायकमांड कधी पदावरून पायउतार होण्यास सांगेल या कारणाने मुख्यमंत्री तणावात आहेत.
सिगारेट, तंबाखू अन् कोल्ड ड्रिंक महागणार? ‘या’ दैनंदिन वस्तू स्वस्त होणार, 21 डिसेंबरला होणार निर्णय
महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडी आणि नितीन गडकरी यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत सुरू असलेल्या वादात गडकरींच्या या वक्तव्यावरून अनेक अर्थ काढले जात आहेत. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन 10 दिवस उलटले तरी महाराष्ट्रात सरकार स्थापन झालेले नाही.
भाजपकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले असले तरी अद्याप त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही. उद्या राज्यात भाजपचे दोन निरीक्षक येणार आहेत. ते उद्या भाजपचा विधीमंडळ नेता आणि गटनेता ठरवणार असल्याची देखील माहिती मिळतेय. पाच डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी पार पडणार आहे.