सिगारेट, तंबाखू अन् कोल्ड ड्रिंक महागणार? ‘या’ दैनंदिन वस्तू स्वस्त होणार, 21 डिसेंबरला होणार निर्णय
Cold Drinks Cigarettes Tobacco Price May Increase : येत्या काही दिवसांत व्यसन महाग पडणार असल्याचं दिसतंय. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या बैठकीत काही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सिगारेट आणि तंबाखूवरील जीएसटी (GST) वाढवण्याचा समावेश आहे. तंबाखू आणि सिगारेटशी संबंधित उत्पादनांवरील कर (Goods and Service Tax) सध्याच्या 28 टक्क्यांवरून 35 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.
जीएसटी कौन्सिलच्या बैठकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ही बैठक 21 डिसेंबर रोजी जैसलमेरमध्ये होणार आहे. या बैठकीत अनेक मोठे निर्णय आणि महत्त्वाचे बदल होऊ शकतात. त्यामुळे शितपेय, तंबाखू आणि सिगारेटच्या (Cold Drinks Cigarettes Tobacco Price) किमती वाढू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे काही दैनंदिन गोष्टी स्वस्त होण्याची देखील शक्यता आहे. आरोग्य आणि जीवन विम्यावर जीएसटीमधून सूट देण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. जीएसटीची ही बैठक अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
पुरावे असतील तर नक्की द्या, लोकसभेत EVM नव्हतं का? किरीट सोमैय्यांचे थेट चॅलेंज
या बैठकीत काही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सिगारेट आणि तंबाखूवरील जीएसटी वाढवण्याचा समावेश आहे. सिगारेट आणि तंबाखूवर जीएसटी वाढवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही सरकारने सिगारेट आणि तंबाखूवर कर लावला आहे. GST दर तर्कसंगत बनवण्याच्या दृष्टीने तंबाखू आणि सिगारेटशी संबंधित उत्पादनांवरील कर सध्याच्या 28 टक्क्यांवरून 35 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा निर्णय महसूल संकलन वाढविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असू शकतो. हा दर निश्चित करण्यासाठी बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांच्या गटाची सोमवारी बैठक झाली.
सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली! भाजपचं केंद्रीय शिष्टमंडळ आज मुंबईत; विधीमंडळ नेता ठरणार?
तंबाखूवर 35 टक्के विशेष दर प्रस्तावित करण्यावर सहमती झाली आहे. यासाठी सध्याची 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के अशी चार स्तरीय कर रचना कायम राहणार आहे. यामध्ये नवीन 35 टक्के दर देखील समाविष्ट होण्याचा अंदाज आहे.
‘या’वरील जीएसटी कमी होण्याची शक्यता
पॅकेज केलेले कोल्ड ड्रिंक्स (20 लिटर आणि त्याहून अधिक): जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यापर्यंत कमी केला जाईल.
10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सायकलीवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी केला जाईल.
वही: जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवरून केला पाहिजे.
शूजची किंमत 15,000 रुपये प्रति जोडीपेक्षा जास्त असेल तर जीएसटी 18 टक्क्यांवरून 28 टक्के करण्यात आलाय.
25 हजार रूपये किमतीपेक्षा जास्त असलेली मनगटावरील घटाळे : GST 18 टक्क्यांवरून 28 टक्के करण्यात आलाय.