Download App

Maratha Reservation : मराठ्यांनो निवडणुकीच्या मैदानात उतरा; प्रकाश आंबेडकरांची नवी खेळी

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Prakash Ambedkar : मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) प्रश्न शांततेने सोडवण्याऐवजी मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण केले जात आहेत. मराठा (Maratha) आणि ओबीसीसाठी (OBC)वेगळे आरक्षण असावे, अशी वंचित बहुजन आघाडीची स्पष्ट भूमिका आहे. आरक्षणाशी संबंधित काही आंदोलने पाहिली असून ती कशी दडपली जातात, हे माहिती आहे. मराठा समाजाचे आंदोलन दडपले जाऊ नये यासाठी त्यांनी निवडणूक लढवली पाहिजे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी(Prakash Ambedkar) मनोज जरांगेंना दिला.

Zarkhand : रेल्वेचा मोठा अपघात; 12 जणांना चिरडलं, अनेक जखमी 

आज माध्यमांशी बोलतांना आंबेडकर म्हणाले की, आगामी निवडणुक ही पक्षाची नाही. कोणत्या पक्षाला सत्तेत बसवायचे याची नाही. परंतु हक्क अबाधित ठेवण्यासाठीची ही निवडणूक आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. उद्याची व्यवस्था कशी असेल हे राज्य सरकारने दाखवून दिले आहे. शासकीय कर्मचारी भरती प्रक्रिया राबविण्याऐवजी कंत्राटी पद्धतीने भरती केली जात आहे. वेठबिगार आणण्याचाी सरकारची भूमिका आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागरिकांचे स्वातंत्र्य बंदिस्त करण्याचा कट रचत आहेत. त्यासाठी दंगलीही घडवल्या जातील. आरक्षणही कागदावरच ठेवले जाईल, असंही आंबेडकर म्हणाले.

‘मनोज जरांगेंनी मर्यादेत रहावं, आता माफी नाहीच’; गिरीश महाजनांनी सुनावलं!

मुस्लिमांनाही सोबत घ्या
उपेक्षितांच्या चळवळी उभ्या करतांना मुस्लिम समाजाही बरोबर घ्यावे लागेल. मुस्लिम समाज राजकीय पक्षांमध्ये आपली सुरक्षितता शोधत आहे. मात्र राजकीय पक्ष त्यांना सुरक्षा देणार नाहीत. मुस्लिम आणि इतर उपेक्षित लोकांमधील वाद संपल्यानंतरच त्यांना सुरक्षा मिळेल. त्यामुळे परिवर्तन घडवून आणण्यासाठी उपेक्षित जनतेला जाती-धर्माचा विचार न करता एकजुटीने लढा द्यावा लागेल, असे आवाहनही आंबेडकरांनी केले.

पुन्हा भाजपचे सरकार नको
लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. देशात पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार येणार नाही याची काळजी घ्या, असंही आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, उद्या महाविकास आघाडीशी युती होईल की नाही हे सांगता येत नाही. पण आम्हाला युती हवी आहे, असं आंबेडकर म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज