Zarkhand : रेल्वेचा मोठा अपघात; 12 जणांना चिरडलं, अनेक जखमी
Zarkhand Train Accident : झारखंडच्या जामताडा जिल्ह्यात रेल्वेचा मोठा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून रेल्वेतून अचानक उड्या मारल्याने समोरुन येणाऱ्या रेल्वेने तब्बल 12 जणांना चिरडलं (Zarkhand Train Accident) आहे. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे. आत्तापर्यंत तरी 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधानसभा अध्यक्ष आले धावून; हिमाचलमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ फेल : सुख्खू सरकार थोडक्यात वाचले
या अपघातात जखमी आणि मृत्यू झालेले सर्व प्रवासी अंग एक्सप्रेसमधून प्रवास करीत होते. त्याचवेळी अचानक गाडीतील काही प्रवाशांकडून गाडीला आग लागल्याची अफवा उठवण्यात आली होती. घाबरलेल्या अवस्थेत गाडीतील प्रवाशांनी थेट रेल्वेतून खाली उड्या मारल्या होत्या. याचदरम्यान, समोरुन आलेल्या रेल्वेने 12 प्रवाशांना चिरडलं आहे.
PM मोदींचा एक दिवसाचा दौरा, खर्च मात्र 12.75 कोटी; पैशांच्या उधळपट्टीवर काँग्रेसचा संताप
ज्यावेळी रेल्वेतील प्रवाशांनी उड्या मारल्या आणि समोरुन येणाऱ्या रेल्वेने त्यांना चिरडलं त्यावेळी रेल्वेतील प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी एकच किंकाळी फोडली होती. अनेकांनी त्यांचा जीव वाचवण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, या प्रवाशांमधील 12 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक जण गंभीर स्वरुपात जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधींकडून दखल…
रेल्वे अपघाताची माहिती समजताच आमदार इरफान अंसारी यांनी घटनास्थळी तत्काळ मदत पोहोचवण्याबात आदेश दिले असून जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाकडून मदत पोहोचवण्याचं कार्य सुरु करण्यात आलं आहे. त्यासाठी पोलिस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे.
दरम्यान, आत्ता सध्या ज्या ठिकाणी अपघात झाला आहे. त्या ठिकाणी काळोख असू या अपघातात नेमकी कोणाची चूक होती, कोणाच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडलायं., त्याची चौकशी करण्याती मागणी नागरिकांकडून केली जात आहे.