Sanjay Raut on BRS : राज्यात भारत राष्ट्र समिती (BRS) पक्ष मोठ्या वेगाने विस्तारत चालला आहे. आज पक्ष प्रमुख के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) पंढपुरात आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत भगिरथ भालके आज पक्षात प्रवेश करणार आहेत. या घडामोडींमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यातील नेते केसीआर यांच्यावर टीका करू लागले आहेत. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
राऊत म्हणाले, महाराष्ट्रात येऊन कुणाला शक्तीप्रदर्शन दाखवताय, तुमचा पक्ष तेलंगणातला. इथे महाराष्ट्रात शक्तीप्रदर्शन करत असताना दिल्लीत पक्ष फुटलाय. अनेक पदाधिकारी, माजी मंत्र्यांनी दिल्लीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हा त्यांच्या पक्षाला मोठा हादरा आहे. ताफा घेऊन आलेत. हे सत्तेचं पैशांचं ओंगळवाणं प्रदर्शन आहे जे इथे शिंदे सुद्धा करत आहेत. करू द्या या राज्यातील जनता सूज्ञ आहे.
मतदारसंघात या, माझ्याविरुद्ध उभे राहा; देसाईंचे राऊतांना ओपन चॅलेंज!
हे आता स्पष्ट झालं आहे की बीआरएस ही भाजपची बी टीम आहे. याआधी एमआयएम आलं होतं. इथे यायचं महाविकास आघाडीला काहीतरी त्रास द्यायचा. या पलीकडे त्यांचा दुसरा हेतू मला दिसत नाही. मोठ्या प्रमाणात पैसे टाकून लोकं विकत घेणं कार्यकर्ते विकत घेणं हा पैसा इथे कोणत्या मार्गाने येतोय याचीही चौकशी व्हायला पाहिजे. त्यांचं स्वागत कसलं करता. याआधी कधीच ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी आल्याचं मला तरी माहिती नाही. त्यांचे आणि आमचे व्यक्तिगत चांगले संबंध आहेत. पण त्यांनी आधी ठरवायला पाहिजे की त्यांना कुणाविरुद्ध लढायचे आहे, असा सवाल राऊत यांनी केला.
अशीच नौटंकी करत राहिले तर..
महाराष्ट्राच्या राजकारणावर केसीआर यांचा काहीच परिणाम होणार नाही. उलट तेलंगणाच्याच राजकारणावर त्याचा परिणाम होईल. महाराष्ट्रात येऊन अशी नौटंकी करत राहिले तर तेलंगणात हारतील. आणि या पराजयाच्या भीतीनेच ते आता महाराष्ट्रात घुसत आहेत.
घनश्याम शेलार पाचव्यांदा पक्षांतराच्या तयारीत; BRS ला नगर जिल्ह्यात मिळणार तगडा शिलेदार!