Download App

आमदार अपात्र होणार म्हणूनच राहुल नार्वेकरांची चालढकल; राष्ट्रवादीच्या आमदाराचा गंभीर आरोप

Satara : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्याच्या राजकारणातील (Maharashtra Politics) घडामोडींनी वेग घेतला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांच्याकडून आता ठाकरे आणि शिंदेंना नोटीसा पाठवल्या जाणार असल्याचे समजते. मात्र या सगळ्याच प्रकरणात विलंब झाल्याने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. आताही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी नार्वेकरांवर गंभीर आरोप केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने गांभीर्याने घेत विधानसभा अध्यक्षांना गर्भित सूचना केली असेल तर हे आमदार अपात्र होणार हे लक्षात आल्यानेच ते चालढकल करत आहेत. त्यामुळे अध्यक्षांनी तातडीने निर्णय दिला नाही तर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला पाहिजे, असे आ. शिंदे म्हणाले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या एका आंदोलनाला भेट दिल्यानंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नार्वेकर यांच्यावर टीका केली. आमदार अपात्रता प्रकरणात दिलेल्या मुदतीत निर्णय घ्यावा असे न्यायालयाने आधीच सांगितले आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले. सरकार आणि अध्यक्ष सुनावणीला उशीर करत आहेत. आमदार अपात्र होणार हे कायद्याने निश्चित झाल्यानंतरच त्यांच्याकडून सुनावणी घेऊन निर्णय घेण्याबाबत चालढकल होत आहे, अशी टीका शिंदे यांनी केली.

Maharashtra Politics : शिंदे अपात्र ठरल्यास CM कोण? अजितदादा, विखे, गडकरीही रेसमध्ये

शिंदे अपात्र ठरल्यास नवा CM कोण?

विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरवलेच तर सरकार वाचविण्यासाठी भाजपने प्लॅन बी तयार केला आहे. शिंदे अपात्र ठरल्यास अजित पवार हे मुख्यमंत्री म्हणून पहिला पर्याय असतील. याव्यतिरिक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही नावे चर्चेत आहेत. विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय घेतल्यानंतरच यासंबंधी काहीतरी घडेल. त्यामुळे पुढील काही दिवसात राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्यास उशीर होत असल्याने सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. एक आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले होते. त्यामुळे आता या प्रकरणाचा निकाल लवकर लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Women’s Reservation : ‘सगळा कारभार पतीच पाहतात’; महिला आरक्षणावर बच्चू कडूंचा ‘प्रहार’

पक्षांतर्गत बंदी कायदा व संविधानातील 10 व्या परिशिष्टानुसार शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरले तर राज्य सरकारसाठी हा मोठा झटका ठरेल. जर ही परिस्थिती निर्माण झालीच तर राज्यात अस्थिरता निर्माण होऊ नये यासाठी भाजपकडून काळजी घेण्यात येत आहे. पुढील रणनीती काय असेल याचीही तयारी केली जात आहे. मात्र, या प्रकरणावर काय निकाल लागेल यावरच सगळी गणित अवलंबून राहणार आहेत.

Tags

follow us