Maharashtra Politics : शिंदे अपात्र ठरल्यास CM कोण? अजितदादा, विखे, गडकरीही रेसमध्ये

Maharashtra Politics : शिंदे अपात्र ठरल्यास CM कोण? अजितदादा, विखे, गडकरीही रेसमध्ये

Maharashtra Politics : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्याच्या राजकारणातील (Maharashtra Politics) घडामोडींनी वेग घेतला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर अॅक्टिव्ह झाले आहेत. या कारवाईत जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अपात्र ठरून त्यांच मुख्यमंत्रीपद गेल्यास त्यांच्या जागी नवा मुख्यमंत्री कोण याची जुळवाजुळव करण्यास भाजपने (BJP) सुरुवात केल्याची माहिती आहे. शिंदे अपात्र ठरल्यास भाजपने प्लॅन बी तयार ठेवला असून त्यावर कामही सुरू केल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद गमवावे लागल्यास त्यांच्या जागी अजित पवार (Ajit Pawar), देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, नितीन गडकरी यांच्या नावांची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्यास उशीर होत असल्याने सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. एक आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले होते. त्यामुळे आता या प्रकरणाचा निकाल लवकर लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

फक्त हे राम म्हणायचे बाकी आहे; आमदारांना उद्देशुन राऊतांची जिव्हारी लागणारी टीका

पक्षांतर्गत बंदी कायदा व संविधानातील 10 व्या परिशिष्टानुसार शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरले तर राज्य सरकारसाठी हा मोठा झटका ठरेल. जर ही परिस्थिती निर्माण झालीच तर राज्यात अस्थिरता निर्माण होऊ नये यासाठी भाजपकडून काळजी घेण्यात येत आहे. पुढील रणनीती काय असेल याचीही तयारी केली जात आहे. मात्र, या प्रकरणावर काय निकाल लागेल यावरच सगळी गणित अवलंबून राहणार आहेत.

विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरवलेच तर सरकार वाचविण्यासाठी भाजपने प्लॅन बी तयार केला आहे. शिंदे अपात्र ठरल्यास अजित पवार हे मुख्यमंत्री म्हणून पहिला पर्याय असतील. याव्यतिरिक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही नावे चर्चेत आहेत. विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय घेतल्यानंतरच यासंबंधी काहीतरी घडेल. त्यामुळे पुढील काही दिवसात राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे जर अपात्र झालेच तर त्यांचे राजकीय पुनर्वसन करावे लागणार आहे. शिंदे यांच्यासह आमदार अपात्र झाले तर त्यांचे पुनर्वसन कसे करणार हा प्रश्न आहेच. तर दुसरीकडे अजित पवार मुख्यमंत्री होतील अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढणार असल्याचे भाजप नेत्यांकडून वारंवार सांगितले जात होते. आता या नेत्यांकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

काँग्रेसने महिला आरक्षण विधेयक १२ वेळा संसदेतून परत पाठवले; बावनकुळेंची टीका

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube