Download App

बावनकुळेजी, आधी ‘या’ प्रश्नांची उत्तरे द्या; ठाकरे गटाच्या नेत्यांनं दिलं आव्हान

Ambadas Danve : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका भाजपाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध भाजप कार्यकर्ते करत आहेत. तर दुसरीकडे भाजप नेतेही ठाकरेंवर तुटून पडले आहेत. त्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते तशा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मोर्चा सांभाळला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलेल्या टीकेवर दानवे यांनी जोरदार पलटवार केला आहे.

Yugendra Pawar : पवारांनी फोडलं अजितदादांच घर?; युगेंद्र पवार पहिल्यांदाच राजकीय फ्रेममध्ये

दानवेंनी बावनकुळेंना चार प्रश्न विचारले असून या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान त्यांना दिले आहे. प्रत्येक वेळी सरकार स्थापनेसाठी मातोश्रीच्या उंबरठ्यावर का येत आहेत?, मोदीजींच्या चेहऱ्याशिवाय 63 आमदार निवडून आणून दाखवणाऱ्या माणसाशी सख्य ठेवण्यास का तुमच्या पक्षाची धडपड होती?, वयच प्रमाण मानायचे तर फडणवीस यांच्यापेक्षा कमी वयाची माणसे आमदार, खासदार, नगरसेवक म्हणून उद्धव ठाकरे यांनी सभागृहात पाठवले, हे विसरुन कसं चालेल? तुमचे नेते स्वतःचे करिअर घडवत होते, कारण त्यांना स्वतःला मोठे व्हायचे होते. उद्धव ठाकरे यांनी माणसं मोठी केली. जी रेडिमेड तुम्ही नेलीत आणि सरकार बनवले? हे कसं विसरलात? असे टोचणारे प्रश्न त्यांना बावनकुळेंना विचारले आहेत.

उद्धव ठाकरेंनीही दिलं उत्तर 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल नागपूर येथे भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हे नागपूरला लागलेले कलंक असल्याची टीका केली होती. यानंतर भाजपकडून त्यांना जोरदार उत्तर देण्यात आले. नागपूर येथे भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचे पोस्टर फाडले. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील पत्रकार परिषदेत कलंकित करंटा असे म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. यावर आता उद्धव ठाकरेंनी आता प्रत्युत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “कलंक शब्द वापरला तर तळपायाची आग मस्तकाला जाण्याची गरज काय? तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करताना भ्रष्टाचाराचा कलंक नाही का लावत तुम्ही? हसन मुश्रीफांच्या पत्नीने रस्त्यावर उतरून आक्रोश केला होता. तेच हसन मुश्रीफ त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. मला आज कळलं यांनाही मांडी आहे. तेही दुसऱ्यांच्या मांडीला मांडी लावत आहेत. तुम्ही म्हणाल तर तो भ्रष्ट आहे, आणि मग त्यांना तुम्ही मंत्रिमंडळात स्थान देता. तुम्ही म्हणाल तर तो भ्रष्ट, नाहीतर तो देव.”

Tags

follow us