Download App

‘अण्णा उठा, भाजपाच्या भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध रणशिंग फुंका’; राऊतांची अण्णांकडे आंदोलनाची मागणी

Sanjay Raut on Anna Hajare : मणिपूरमधील घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. या घटनेचा निषेध करत केंद्र सरकावर टीकेची झोड उठलेली असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही संताप व्यक्त केला. मणिपूरमधील घटना निंदनीय असून यातील नराधमांना फासावर लटकावलं पाहिजे. या घटनेसंबंधी केंद्र सरकार काहीच बोलत नाही, हे आणखी चिंताजनक आहे, अशा शब्दांत अण्णांनी सरकारला फटकारले होते. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हजारेंना घेरले आहे.

राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत अण्णा हजारे यांना भाजपाच्या भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध आंदोलन करण्याचं आवाहन केलं. राऊत म्हणाले, अण्णा हजारे सक्रिय आहेत हे या निमित्तानं दिसलं हे बरं झालं. खरं म्हणजे अण्णा काहीतरी बोलतील याची आम्ही काही वर्षांपासून मागणी करतोय. अण्णांनी थेट मणिपुरलाच हात घातला. अशा प्रकारच्या घटना देशात खूप घडत आहेत. जंतरमंतरवर घडलं. मणिपुरातही घडलं. पण अण्णांची जी ओळख देशाला आहे ती भ्रष्टाचाराविरोधात लढणारे नेते म्हणून.

Letsupp Special : ‘माझं तिकीट फायनल, भाजपाला मस्का लावणार नाही’; जानकरांनी फुंकलं रणशिंग!

महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचं मोठं कारस्थान, त्याविरुद्ध आवाज उठवा

महाराष्ट्रात ज्यांच्यावर भाजपने पुराव्यांसह भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सगळं लोक शपथ घेऊन भाजपच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून सहभागी झाले आहेत. अण्णा हजारे यांनी आधी यावर आवाज उठवायला हवा. अजित पवार असतील, हसन मुश्रीफ असतील किंवा शिवसेनेतून बेईमानी करून जे गेले आणि आता मंत्री असतील या सगळ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. अण्णा हजारेंनी या विषयावर भूमिका व्यक्त करुन एका आंदोलनाची घोषणा केली पाहिजे आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत.

अण्णा बोलताहेत ठीक आहे पण मणिपूर विषयावर अख्खा देशच जागा झाला आहे. या मु्द्द्यावर देशच रस्त्यावर आहे. दिल्लीत असे अनेक विषय मधल्या काळात घडले तिथे थेट भारतीय जनता पार्टीचा संबंध होता. आम्ही वाट पाहत होतो की अण्णा त्यावर काहीतरी बोलतील, काहीतरी भूमिका घेतील. आताही महाराष्ट्रात सर्वात मोठं भ्रष्टाचाराचं जे कारस्थान झालं आहे सगळे ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी या सरकारमध्ये सामील झाले आहेत. आणि प्रधानमंत्री त्यांचा दिल्लीत सत्कार करत आहेत.

Pankaja Munde : ‘पंकजांना भाजपमध्ये जास्त त्रास झाला तर’… भाऊ जानकरांचा निर्वाणीचा इशारा

मी स्वतः काही प्रकरणं बाहेर काढली. दादा भुसेंचा 178 कोटींचा घोटाळा, राहुल कुल यांचं 500 कोटींचं मनी लाँड्रिंग, अब्दुल सत्तार, राधाकृष्ण विखे पाटील. हे अण्णांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या आसपास घडतंय. माझी अण्णांना हात जोडून विनंती आहे, की अण्णा हा देश वाचवायचा आहे. तुम्ही देश वाचविण्याची भूमिका घेतलेली आहे. आज खरी आंदोलनाची गरज आहे. अण्णा हजारेंनी त्या काळात आंदोलन केलं म्हणून भारतीय जनता पार्टी सत्तेत आली आणि काँग्रेस सत्तेतून गेलं. आज त्याच भाजपाच्या भ्रष्टाचाऱ्यांविरोधात अण्णांना रणशिंग फुंकण्याची गरज आहे.

Tags

follow us