Uddhav Thackeray : राज्यात मराठा आरक्षणाचं (Maratha Reservation) आंदोलन पेटलं आहे. तर दुसरीकडे पाऊस नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. पाणीच नसल्याने शेती संकटात सापडली असून अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभुमीवर (Uddhav Thackeray) ठाकरे गटाने पुन्हा एकदा सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत.
राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. सरकारला एक मुख्यमंत्री आणि दोन अनुभवी उपमुख्यमंत्री लाभले आहेत. या तिघांना अवतारी पुरुष पंतप्रधान मोदींचे आशीर्वाद लाभले आहेत. तरीही महाराष्ट्राचा शेतकरी दुष्काळाने होरपळून गेला आहे. त्याची शेते सुकली आहे. एका बाजूला एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे आपापल्या गटातील आमदार, खासदारांवर कोट्यावधींच्या निधीची पावसाप्रमाणे बरसात करत आहेत. पण, पाऊस पाण्याअभावी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांपर्यंत या लूटमार निधीतला रुपयाही पोहोचत नाही. राजकारणासाठी पैसा आहे पण शेतकऱ्यांसाठी नाही, अशी घणाघाती टीका या अग्रलेखात केली आहे.
Assembly Election : कोण बाजी मारणार? प्रशांत किशोर यांनी सांगितला 5 राज्यांचा ‘मूड’
मुख्यमंत्री शिंदे स्वतःला शेतकरी पुत्र समजतात. ते साताऱ्यातील त्यांच्या शेतावर हेलिकॉप्टर उतरवतात व शेती करतात. फडणवीस-अजित पवार त्याच पद्धतीने पंचतारांकित शेतकरी आहेत. पवार-शिंद्यांना रताळे जमिनीत उगवते की झाडावर ते कळते पण, महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणावर त्यांच्याकडे तोड नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ते थांबवू शकत नाहीत, अशी टीका सामनात करण्यात आली आहे.
मुंबईतील नगरसेवक फोडण्यासाठी आतापर्यंत 700 कोटी रुपये खर्च झाले. त्यात पालिकेचा निधी आहे. नगरविकास खात्याची उधळपट्टी आमदारांवर सुरुच आहे. ती थांबवून सर्व पैसा दुष्काळ निवारणासाठी, शेतकरी बांधवांच प्राण वाचविण्यासाठी खर्चायला हवा. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात एकट्या ऑगस्टमध्ये 30 पेक्षा जास्त आत्महत्या झाल्या. आता या मृतांवर कृषीमंत्री जेसीबीने फुले उधळणार आहेत काय, असा परखड सवाल ठाकरे गटाने केला आहे.
‘माढा माणमध्ये कोणता उमेदवार नको, याचं नियोजन सुरु’; रामराजेंच्या विधानाने एकच खळबळ