‘माढा माणमध्ये कोणता उमेदवार नको, याचं नियोजन सुरु’; रामराजेंच्या विधानाने एकच खळबळ
Ramraje Nimbalkar : साताऱ्यातील माढा लोकसभा आणि माण विधानसभेतला उमेदवार कोण, यापेक्षा ‘कोण नको’ याचं नियोजन सुरु असल्याचं वक्तव्य विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर(Ramraje Naik Nimbalkar) यांंनी केलं आहे. यावेळी बोलताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी कोणाचंही नाव घेतलं नसून रणजीतसिंह नाईक निंबाळकर(Ranjitsinh Naik Nimbalkar) यांच्यासह जयकुमार गोरे(Jaykumar Gore) यांच्यावर रोख ठेवून बोललं असल्याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार(Dcm Ajit Pawar) यांचा 10 सप्टेंबर रोजी सातारा दौरा असून याच दौऱ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘सनातन’वरून योगी भडकले! ‘रावण, बाबर, औरंगजेब संपवू शकले नाहीतर हे तुच्छ..,’
पुढे बोलताना रामराजे(Ramraje Nimbalkar) म्हणाले, आताची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. आम्ही महायुतीत आहोत. उमेदवार ठरला असेल तर माहीत नाही. पण माढा लोकसभा आणि माण विधानसभेसाठी निवडणुकीत उमेदवार कोण यापेक्षा ‘कोण नको’ हे आम्हाला माहीत असल्याचं रामराजेंनी स्पष्ट केलं आहे. तसेच माण मतदारसंघ हा काय ‘पाकव्याप्त काश्मीर’ आहे का? असा सवालही करत त्यांनी जयकुमार गोरे(Jaykumar Gore) यांना इशाराच दिला.
मराठा अन् ओबीसी आरक्षणाचं कोडं कसं सोडवणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान…
तसेच येत्या 10 सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) हे पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात येत असून शिरवळ ते रेठरे यादरम्यान त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे. अजित पवार कराड येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन कोल्हापूरला जाणार आहेत. या संदर्भात आमदार मकरंद पाटील आणि आमचे नियोजन सुरू असल्याचे रामराजे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची सातारा जिल्ह्यात मोठी ताकद असून आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकाही पुढील वर्षी पार पडणार आहे, त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे, याच दौऱ्यादरम्यान अजित पवार आपला माण आणि माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार ठरवणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.